अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल!

By अमित इंगोले | Updated: September 29, 2020 10:39 IST2020-09-29T10:36:01+5:302020-09-29T10:39:27+5:30

नुसरत यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. कारण त्या एका मुस्लिम परिवारात जन्माला आल्या आणि नंतर हिंदू व्यक्ती निखील जैनसोबत लग्न केलं.

Actress and MP Nusrat Jahan gets death threats after posing as goddess durga in photoshoot | अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल!

अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल!

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना ही धमकी ऑनलाइन मिळाली आहे. नुसरत जहाँ यांनी दुर्गा देवीच्या रूपातील फोटोशूट केलं होतं. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर नुसरत धार्मिक द्वेषाची शिकार झाल्या होत्या. लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. इतकेच नाही तर एकाने तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही देऊन टाकली.  नुसरत यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. कारण त्या एका मुस्लिम परिवारात जन्माला आल्या आणि नंतर हिंदू व्यक्ती निखील जैनसोबत लग्न केलं.

नुसरत यांचे हे फोटो समोर आल्यावर अनेक सोशल मीडिया यूजर्सने त्यांना हिंदू सरनेम वापरण्याचा सल्ला दिला होता. नुसरत यांनी महालयाच्या निमित्ताने दुर्गा देवीच्या रूपात फोटोशूट केलं होतं. नंतर हे फोटो सोशल मीडियात शेअर केल्यावर वाद निर्माण झाला. त्यांना अनेक सोशल मीडिया यूजर्सनी ट्रोल केलं होतं. 

एका यूजरने नुसरत यांच्या फोटोवर कमेंट करत धमकीसारखं लिहिल की, 'तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. अल्लाहला घाबर. तू तुझं शरीर झाकून ठेवू शकत नाही का? छी छीछी'. एका दुसऱ्या यूजरने लिहिले की,  'तू तुझं नाव बदलून नुसरत जहांऐवजी नुसु दास किंवा घोष किंवा सेन ठेव'.

दरम्यान, याआधीही अनेकदा नुसरत जहाँ या ट्रोल झाल्या होत्या. त्या लग्नानंतर पहिल्यांदाच संसदेत कपाळावर कुंकू लावून पोहोचली होती. त्यावेळी कट्टरपंथीयांनी नुसरतवर जोरदार टीका केली होती. पण नुसरत यांनी बहादुरीने या लोकांची बोलती बंद केली होती.

हे पण वाचा :

खासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...

Web Title: Actress and MP Nusrat Jahan gets death threats after posing as goddess durga in photoshoot