अमीषा पटेलला ‘या’ राजकीय नेत्याच्या मुलानं सोशल मीडियावर केलं प्रपोज, पण नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:11 IST2022-01-02T17:09:58+5:302022-01-02T17:11:22+5:30

Amisha Patel : सोशल मीडियावरचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे अमीषा पटेलची चर्चा होते. सध्याही चर्चा आहे ती, अमीषाने शेअर केलेल्या फोटोंचीच.

Actress Amisha Patel Wishes Faisal Patel On His Birthday And In Reply He Proposed Her For Marriage | अमीषा पटेलला ‘या’ राजकीय नेत्याच्या मुलानं सोशल मीडियावर केलं प्रपोज, पण नंतर...

अमीषा पटेलला ‘या’ राजकीय नेत्याच्या मुलानं सोशल मीडियावर केलं प्रपोज, पण नंतर...

अमीषा पटेल (Amisha Patel ) सध्या ‘गदर 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. तशी ती या ना त्या कारणानं चर्चेत असते. सोशल मीडियावरचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे तिची चर्चा होते. सध्याही चर्चा आहे ती, अमीषाने शेअर केलेल्या फोटोंचीच. होय, अमीषाने तिच्या जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही फोटो शेअर केले होते. पण  या फोटोवरून वेगळीच चर्चा सुरू झाली होती. हे प्रकरण वेगळंच आहे, असं सगळ्यांना वाटलं होतं आणि आता ते स्पष्ट झालं आहे.

अमीषाने फैसल पटेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही फोटो पोस्ट केले होते. ‘हॅपी बर्थ डे माय डार्लिंग फैसल पटेल, लव्ह यू, तुझं वर्ष चांगलं जावो,’ असं तिने या फोटोंसोबत लिहिलं होतं. पण खरी बातमी पुढे आहे.

होय, अमीषाच्या या पोस्टवर फैसलने लगेच उत्तर दिलं आणि त्याचं ते उत्तर पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. अर्थात काही क्षणात फैसलने त्याची पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते.


‘थँक्यू अमीषा पटेल. मी तुला पब्लिकली प्रपोज करतोय, तु माझ्याशी लग्न करशील?’असं फैसलने लिहिलं होतं. यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. पण याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  अमीषा व फैसल यांच्यात काहीतरी खिचडी नक्की शिजतेय, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

अमीषा व फैसल यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. आता फैसल पटेल कोण? तर तो काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा आहे. फैसल एक मोठा बिझनेसमॅन आहे. जैनब पटेलसोबत त्याचं लग्न झालं होतं. पण आता त्याची पत्नी या जगात नाही. 7 जून 2016 रोजी त्याच्या पत्नीचं आजारपणाने निधन झालं होतं.

Web Title: Actress Amisha Patel Wishes Faisal Patel On His Birthday And In Reply He Proposed Her For Marriage