२०२६ ची सुंदर सुरुवात! आलिया भटने शेअर केला रणबीर आणि लेकीसोबतचा क्यूट फोटो, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 17:11 IST2026-01-04T17:09:40+5:302026-01-04T17:11:24+5:30
आलिया भटने लेक राहा आणि पती रणबीरसोबत नवीन वर्षाचं खास स्वागत केलं आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे

२०२६ ची सुंदर सुरुवात! आलिया भटने शेअर केला रणबीर आणि लेकीसोबतचा क्यूट फोटो, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आलियाने पती रणबीर कपूर आणि मुलगी राहा कपूर यांच्यासोबतचा गोड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो अवघ्या काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
आलियाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये राहासोबत रणबीर खेळताना दिसतो. फोटोमध्ये रणबीरने राहाला कडेवर घेतले असून तिला उंचावर झेपावलं आहे. विशेष म्हणजे राहा, रणबीर आणि आलियाने एकमेकांना मॅचिंग असा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. राहा अत्यंत आनंदात दिसत आहे. या फोटोंना आलियाने "२०२६ ची सुंदर सुरुवात" असे कॅप्शन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहा कपूरचे फोटो आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. कपूर खानदानाच्या ख्रिसमस लंचपासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत राहाच्या प्रत्येक हालचालीवर कॅमेरे खिळलेले असतात. आलिया आणि रणबीरने सध्या राहाला मीडियापासून लांब ठेवले होते, मात्र आता ते अधूनमधून राहाचा चेहरा लपवून तिची झलक चाहत्यांना दाखवत असतात.
आलियाने शेअर केलेल्या या नव्या फोटोंवर करीना कपूर, रिद्धिमा कपूर आणि नीतू कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट्स करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघेही सध्या 'लव्ह अँड वॉर' या सिनेमात एकत्र काम करत आहेत. या सिनेमात दोघांसह विकी कौशल झळकणार आहे. याशिवाय याच वर्षी २०२६ च्या दिवाळीत रणबीर कपूरचा 'रामायण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.