Rishabh Pant Accident : अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:06 PM2022-12-31T12:06:46+5:302022-12-31T12:14:16+5:30

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत.

actors-anil-kapoor-anupam-kher-met-rishabh-pant-in-hospital-says-keep-praying | Rishabh Pant Accident : अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा...

Rishabh Pant Accident : अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा...

googlenewsNext

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. दरम्यान अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन रिषभची आणि त्याच्या परिवाराची भेट घेतली.

रिषभ पंत सध्या डेहरादून च्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे शरीर भाजले असून नुकतीच त्याच्यावर सर्जरी पार पडली आहे. रिषभची विचारपूस केल्यानंतर अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'सर्वांनी रिषभसाठी प्रार्थना करावी', असे ते यावेळी म्हणाले.

Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...

नेमकं काय घडलं ?

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला.यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. माहिती मिळताच देहरादून पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी दिली.

Web Title: actors-anil-kapoor-anupam-kher-met-rishabh-pant-in-hospital-says-keep-praying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.