अभिनेता विवेक ओबेरॉयला दीड कोटींना गंडवले; तिघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:45 AM2023-07-21T08:45:04+5:302023-07-21T08:45:35+5:30

तिघांविरोधात गुन्हा, एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

Actor Vivek Oberoi was swindled for 1.5 crores; Crime against three | अभिनेता विवेक ओबेरॉयला दीड कोटींना गंडवले; तिघांविरोधात गुन्हा

अभिनेता विवेक ओबेरॉयला दीड कोटींना गंडवले; तिघांविरोधात गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : सिनेक्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरू केलेल्या आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमधील भागीदारांनीच दीड कोटी रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी निर्माता संजय साहा यांच्यासह  नंदिता साहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.  

ओबेरॉय मेगा एन्टरटेन्मेंटचे लेखापाल देवेन बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीची  स्थापना झाली. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या फर्मचे भागीदार आहेत.  ऑरगॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी सिनेक्षेत्रात काम करण्याचे ठरवले. याच दरम्यान विवेक यांची संजय साहा यांच्याशी ओळख झाली. साहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संजय साहा यांच्यासह, नंदिता साहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या फर्ममध्ये भागीदार बनवले. 

पुढे त्यांनी, आनंदिता एन्टरटेन्मेंट एलएलपी ही फर्म स्थापन केली. यामध्ये विवेक ओबेरॉय यांना वैयक्तिक खात्यातून तसेच ओबेराय मेगा एन्टरटेन्मेंट एलएलपी या फर्ममधून एकूण ९५,७२,८१४ ही रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वेळोवेळी विविध कारणे पुढे करत, आनंदिता फर्मला कुठलीही माहिती न देता विवेक यांच्या १,५५,७२,८१४ रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.  ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. ४ फेब्रुवारी २०२० ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ही फसवणूक  झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Actor Vivek Oberoi was swindled for 1.5 crores; Crime against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.