अभिनेता तनुज विरवानीची 'इल्लीगल २'मध्ये लागली वर्णी, दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 20:57 IST2021-04-19T20:57:19+5:302021-04-19T20:57:37+5:30

'इल्‍लीगल' या वेबसीरिजमधील कोर्टरूम ड्रामाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.

Actor Tanuj Virwani's character in 'Illegal 2' will be seen in this role | अभिनेता तनुज विरवानीची 'इल्लीगल २'मध्ये लागली वर्णी, दिसणार या भूमिकेत

अभिनेता तनुज विरवानीची 'इल्लीगल २'मध्ये लागली वर्णी, दिसणार या भूमिकेत

'इल्‍लीगल' या वेबसीरिजमधील कोर्टरूम ड्रामाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कायदा यंत्रणेमधील न्‍यायाच्‍या अभावाला सादर करत या शोच्‍या पहिल्‍या पर्वाने लैंगिक छळ व मृत्‍यूदंड अशा ज्वलंत विषयांना प्रकाशझोतात आणले. वूट सिलेक्‍ट आता या कायदेसंबंधित थ्रिलर सिरीजचे दुसरे पर्व सादर करण्‍यास सज्‍ज आहे. या दुसऱ्या पर्वामध्‍ये नवोदित पियुष मिश्रा, नेहा शर्मा व धडाकेबाज अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहेत.

या विद्यमान स्‍टार कलाकारांसोबत असणार आहे तरूण व प्रतिभावान कलाकार तनुज विरवानी. तो शोच्‍या दुसऱ्या पर्वामध्‍ये नेहा शर्माचा प्रेमी म्‍हणून प्रवेश करणार आहे. मोहक दिसणारी ही जोडी पहिल्‍यांदाच स्क्रिनवर एकत्र काम करताना दिसणार आहे आणि शोमधील त्‍यांची केमिस्‍ट्री निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल.


याबाबत तनुज विरवानी म्‍हणाला, ''मी 'इल्‍लीगल'चे पहिले पर्व पाहिले आहे आणि कथानक, कलाकारांचा अभिनय व सादरीकरणाने माझे लक्ष वेधून घेतले. म्‍हणूनच मला कलाकारांमध्‍ये सामील होण्‍यासोबत श्री. पियुष मिश्रा यांच्‍यासारखे दिग्‍गज अभिनेते आणि नेहा, अक्षय व सत्‍यदीप यांच्‍यासारख्‍या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्‍याबाबत विचारण्‍यात आले तेव्हा मला अधिक विचार करावा लागला नाही. कोर्टरूम ड्रामा ही शैली माझ्यासाठी नवीन आहे आणि ही शैली अत्‍यंत रोमांचक आहे. मी वकिलांच्‍या समूहामध्‍ये उद्योगपती म्‍हणून प्रवेश करत आहे आणि पडद्यावर यांच्‍यामधील डायनॅमिक कशाप्रकारे दिसून येते हे पाहण्‍यासाठी मी खूपच उत्‍सुक आहे.''

'इल्‍लीगल सीझन २' लवकरच वूट सिलेक्‍टवर पहायला मिळेल.

 

Web Title: Actor Tanuj Virwani's character in 'Illegal 2' will be seen in this role