सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते शर्मन जोशीची बायको, ती आहे प्रसिद्ध व्हिलनची लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 13:45 IST2022-04-28T13:42:08+5:302022-04-28T13:45:12+5:30

अभिनेता शर्मन जोशीने 'रंग दे बसंती', 'स्टाईल', 'मेट्रो', 'थ्री इडियटस', 'गोलमाल', 'फेरारी की सवारी' अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.

Actor Sherman Joshi's wife, the famous villain's dughetr | सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते शर्मन जोशीची बायको, ती आहे प्रसिद्ध व्हिलनची लेक

सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते शर्मन जोशीची बायको, ती आहे प्रसिद्ध व्हिलनची लेक

अभिनेता शर्मन जोशीने 'रंग दे बसंती', 'स्टाईल', 'मेट्रो', 'थ्री इडियटस', 'गोलमाल', 'फेरारी की सवारी' अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कॉमिक टायमिंगवर तर त्याचे चाहते फिदा आहेत. आज शरमन  जन्म 28 एप्रिल 1979 मध्ये मुंबईत झाला होता.  अभिनयाचा वारसा आपल्या घरातूनच लाभला आहे. त्याचे वडील अरविंद जोशी हे गुजराती रंगभूमीचे प्रसिद्ध कलाकार होते. शर्मनची बहीण मानसी जोशी ही टीव्ही आणि चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आज शरमन त्याचा 43वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्याची लव्हस्टोरी.. 
 
शर्मनचं लव्ह मॅरेज आहे.  शर्मन आणि प्रेरणा यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १५ जून २००० मध्ये या दोघांनी कुटुंबाच्या संमतीने मुंबईत लग्नगाठ बांधली. शर्मन आणि प्रेरणाला एक मुलगी आणि दोन जुळी मुलं आहेत. प्रेरणा बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा prem chopra यांना तीन मुली असून यापैकी एकीने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे. प्रेम चोप्रा यांना पुनिता, रतिका आणि प्रेरणा अशा तीन मुली आहेत. यामध्ये पुनिताने अभिनेता विकास भल्लासोबत लग्न केलं आहे. तर रतिकाचा पती पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदा आहे. यापैकी प्रेरणाने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे.

शर्मनला पत्नी प्रेरणा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळते. दरम्यान, प्रेम चोप्रा बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक असून त्यांनी ८० चा काळ गाजवला आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: Actor Sherman Joshi's wife, the famous villain's dughetr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.