राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संजय दत्त जाणार का ? म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 07:05 PM2024-01-12T19:05:10+5:302024-01-12T19:07:56+5:30

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाला देशभरातून अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

Actor Sanjay Dutt On Ram Mandir Pranpratishtha Ceremony | राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संजय दत्त जाणार का ? म्हणाला...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संजय दत्त जाणार का ? म्हणाला...

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसं या सोहळ्यामध्ये कोण-कोण सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाला देशभरातून अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अलीकडेच संजय दत्तने  राम मंदिरात दर्शन घ्यायला जाण्यावर भाष्य केलं. 

 संजय दत्त बिहारच्या गयामध्ये पिंड दान केले. यावेळी त्याला राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. 'ही खूप चांगली गोष्ट आहे', असे तो म्हणाला. तसेच पत्रकारांनी त्याला दर्शनासाठी तू जाणार असाही सवाल केला. यावर तो म्हणाला, 'हो नक्कीच जाणार'. संजय दत्त अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून आले. यावेळी त्याने 'जय भोलेनाथ, जय श्रीराम' असा नाराही लावला. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, येत्या काळात संजय दत्त सुपरस्टार अक्षय कुमारसोबत 'वेलकम 3' या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे. 

रामजन्मभूमी अयोध्यातील बहुप्रतीक्षित ऐतिहासिक श्री राम मंदिर अवघ्या काही दिवसांत भक्तांसाठी खुले होणार आहे. या नेत्रदिपक कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व सेलिब्रिटींना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रजनीकांत, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, रणदीप हुड्डा, लिन लैश्राम, कंगना राणौत, मधुर भांडारकर, सनी देओल, आयुष्मान खुराना, सोनू, प्रभास यांसारखे अनेक कलाकार आहेत. 

Web Title: Actor Sanjay Dutt On Ram Mandir Pranpratishtha Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.