आता माझी सटकली! हेअर ड्रेसरवर भडकला रितेश; रागाच्या भरात व्यक्तीला दिली अशी वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 19:14 IST2022-07-08T19:13:15+5:302022-07-08T19:14:41+5:30
Riteish deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रितेशने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो केस कापायला बसला असून एक स्टालिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे.

आता माझी सटकली! हेअर ड्रेसरवर भडकला रितेश; रागाच्या भरात व्यक्तीला दिली अशी वागणूक
महाराष्ट्राचा लाडका लेक आणि अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो आणि पत्नी जेनेलिया त्यांचे मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक व्हिडीओला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळते. मात्र, यावेळी रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहते थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये रितेश चक्क संतापल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रितेशने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो केस कापायला बसला असून एक स्टालिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. परंतु, साधा हेअर कट करताना तो वारंवार रितेशच्या डोक्यावर वॉटर स्प्रे करत असल्यामुळे रितेश वैतागतो आणि रागाच्या भरात नको ते करुन बसतो.
या व्हिडीओमध्ये रितेश या हेअरड्रेसरकडून त्याचा वॉटर स्प्रे घेतो आणि त्यातलं सगळं पाणी स्वत: च्या डोक्यावर ओतून घेतो. विशेष म्हणजे रितेशने संपूर्ण बाटली रिकामी केल्यानंतरही हा हेअरड्रेसर नवीन बाटली घेऊन पाणी स्प्रे करतो. त्यामुळे रितेश पुन्हा कंटाळून ती बाटली आपल्या डोक्यावर रिकामी करतो. त्याचा हा मजेदार व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, “मी शूटसाठी तयार होत आहे,” असं कॅप्शन देत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.