मिथुन चक्रवर्ती यांना आला होता ब्रेन स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? डॉक्टरांनी दिले अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:12 PM2024-02-10T22:12:58+5:302024-02-10T22:16:37+5:30

Mithun Chakraborty: चक्रवर्ती यांना स्ट्रोक आल्यानंतर कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचा चमू त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना अजूनही विकनेस आहे.

actor Mithun Chakraborty suffered a brain stroke, now improving Update given by doctor | मिथुन चक्रवर्ती यांना आला होता ब्रेन स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? डॉक्टरांनी दिले अपडेट

मिथुन चक्रवर्ती यांना आला होता ब्रेन स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? डॉक्टरांनी दिले अपडेट

दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखत असल्याच्या कारणाने शनिवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट दिले आहे. चक्रवर्ती यांना स्ट्रोक आल्यानंतर कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचा चमू त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना अजूनही विकनेस आहे.

डॉक्टरांनी सांगितलं कशी आहे प्रकृती? -
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना Ischemic Cerebrovascular Accident (स्ट्रोक) आला, ज्याचा संबंध ब्रेनशी आहे. ते आता पूर्णपणे शुद्धीवर आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मिथुन चक्रवर्ती (73) यांना उजव्या बाजूला वरच्या आणि खालच्या अंगाना अशक्तपणा आल्याची तक्रार होती.

यानंतर सकाळी 9.40 वाजता त्यांना कोलकात्यातील अपोलो रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले. नंतर, मेंदूच्या एमआरआयसह इतर आवश्यक टेस्ट, तसेच रेडिओलॉजी टेस्ट करण्यात आली. त्यांना मेंदूचा Ischemic Cerebrovascular Accident (स्ट्रोक) झाल्याचे निदान झाले. ते सध्या पूर्णपणे शुद्धीवर आहेत आणि हलका आहार घेत आहे.

महत्वाचे म्हणजे, 'मिथुन चक्रवर्ती न्यूरो फिजिशियन, कार्डियोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएंट्रेरोलॉजिस्टसह डॉक्टरांच्या एका चमूचे त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष आहे. असेही डॉक्टरांच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

Web Title: actor Mithun Chakraborty suffered a brain stroke, now improving Update given by doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.