​ अभिनेत्री मिथिलीचे लीक झालेले खासगी फोटो हेच तर नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 12:42 IST2017-07-25T07:12:27+5:302017-07-25T12:42:27+5:30

मल्याळम अभिनेत्री मिथिली ब्लॅकमेलिंगची शिकार ठरल्याची बातमी तुम्ही वाचलीच. मिथिलीचा एक्स बॉयफ्रेन्ड किरण कुमार याने तिचे खासगी फोटो सोशल ...

Actor Mithila's leaked private photo is not the same? | ​ अभिनेत्री मिथिलीचे लीक झालेले खासगी फोटो हेच तर नाहीत?

​ अभिनेत्री मिथिलीचे लीक झालेले खासगी फोटो हेच तर नाहीत?

्याळम अभिनेत्री मिथिली ब्लॅकमेलिंगची शिकार ठरल्याची बातमी तुम्ही वाचलीच. मिथिलीचा एक्स बॉयफ्रेन्ड किरण कुमार याने तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकले .  मिथिली आणि किरणकुमार हे दोघे २००८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. किरणकुमार विवाहित होता. पण त्याने ही बाब मिथीलीपासून दडवून ठेवली. अखेर त्याचे बिंग फुटले आणि मिथिलीने त्याच्यासोबतचे सगळे संबंध संपुष्टात आणलेत. पण यानंतर किरण कुमारने मिथिलीला ब्लॅकमेल करणे सुरु केले.


मिथिली व किरणकुमार यांच्या अफेअरदरम्यानचे दोघांनीही काही फोटो क्लिक केले होते. मिथिलीचे एका व्यक्तिसोबतचे इंटिमेट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किरणकुमारने लीक केलेले हेच तर फोटो नाहीत ना, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

मिथिलीच्या सेटवर जाऊन, घरी जाऊन गोंधळ घालण्याचे प्रकार त्याने केले. शिवाय ७५ लाख रुपए देण्याची, अन्यथा मिथिलीचे अतिशय खासगी फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकीही त्याने दिली. गेल्या काही महिन्यांपासून किरण कुमार मिथिलीला अशाप्रकारचा त्रास देत होता. या प्रकाराला त्रासून मिथिलीने थेट पोलिसांत धाव घेऊन किरणकुमार विरोधात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी ही तक्रार फार गंभीरपणे घेतली नाही. इकडे मिथिली आपल्या धमक्यांना दाद देत नाही हे पाहून चवताळलेल्या किरणकुमारने अखेर तिचे फोटो अपलोड करण्याचे ठरवले आणि त्याने हे केले देखील.  किरणकुमारसोबतचे मिथिलीचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरून वेगाने व्हायरल झालेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा मिथिलीने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कुठे पोलिसांना जाग आली.  पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिथिलीचे फोटो व्हायरल करण्यामध्ये आणखी काही लोकांचा हात असल्याचे समोर आले आहे. 
 

Web Title: Actor Mithila's leaked private photo is not the same?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.