अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीची आत्महत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 15:30 IST2017-07-30T10:00:31+5:302017-07-30T15:30:31+5:30
अभिनेता इंदर कुमार याच्या मृत्यूच्या धक्क्यातून मनोरंजन सृष्टी सावरली नसतानाच आज या सृष्टीशी निगडीत आणखी एका मृत्यूने सर्वांना धक्का ...

अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीची आत्महत्या!
अ िनेता इंदर कुमार याच्या मृत्यूच्या धक्क्यातून मनोरंजन सृष्टी सावरली नसतानाच आज या सृष्टीशी निगडीत आणखी एका मृत्यूने सर्वांना धक्का दिला. होय, टीव्ही व बॉलिवूड अभिनेता मनोज गोयल याची पत्नी निलीमा हिने शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
४० वर्षांची निलीमा पती मनोज आणि आपल्या आठ वर्षांच्या मुलीसोबत मुंबईतील कांदिवली भागात राहत होती. याच राहत्या घरी निलीमाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलीमा नैराश्यात होती अशी माहिती मिळतेय. नैराश्यातून आत्महत्या करत असून आणि माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसल्याचे तिने या चिठ्ठीत लिहिल्याचे कळतेय.अर्थात अद्याप पोलिसांनी यास दुजोरा दिलेला नाही.
मनोज यांनी ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’, ‘तू मेरे अगल बगल है’ यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. याशिवाय अजय देवगणसोबत ‘कंपनी’, अमिताभ बच्चनसोबत ‘ब्लॅक’, ‘बंटी और बबली’ अशा अनेक चित्रपटांतही त्याने काम केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलीमा शनिवारी घरात एकटी होती. मनोज कामासाठी बाहेर गेला होता आणि मुलगी शिकवणीला गेली होती. मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता. घरात आई कुठेच दिसत नसल्याने तिने शेजाºयांना हाक मारली. शेजाºयांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी बेडरुमचा दरवाचा तोडला असता आत निलीमा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.