अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात, कारमध्ये होता मुलगा यशवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 09:52 IST2020-06-25T09:47:15+5:302020-06-25T09:52:27+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात झाला आहे.

Actor govinda's car met with an accident | अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात, कारमध्ये होता मुलगा यशवर्धन

अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात, कारमध्ये होता मुलगा यशवर्धन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात झाला आहे. बुधवारी रात्री त्याच्या गाडीला मागून येणाऱ्या   गाडीने धडक दिली आहे. कारमध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि ड्रायव्हर होते. धडक देणारी कार ही यशराज बॅनरची असल्याची माहिती आहे. रात्री 8.30 च्या सुमारास जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या गाडीने धडक दिली आहे ती गाडी ड्रायव्हर चालवत होता.  या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच दोनही गाड्यांचे फारसे नुकसान झालेले नाही. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर गोविंदा शेवटचा 2019मध्ये आलेल्या रंगीला राजा या कॉमेडी सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. 

Read in English

Web Title: Actor govinda's car met with an accident