काय सांगता, भन्साळींनी गोविंदाला ऑफर केला होता ‘देवदास’; वाचा ‘सीक्रेट’ खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 08:00 IST2020-03-04T08:00:00+5:302020-03-04T08:00:02+5:30

या कारणामुळे केला होता रिजेक्ट !

actor govinda on sanjay leea bhanshali devdas he said that he offered the role of chunnilal-ram | काय सांगता, भन्साळींनी गोविंदाला ऑफर केला होता ‘देवदास’; वाचा ‘सीक्रेट’ खुलासा

काय सांगता, भन्साळींनी गोविंदाला ऑफर केला होता ‘देवदास’; वाचा ‘सीक्रेट’ खुलासा

ठळक मुद्दे संजय लीला भन्साळी यांचा ‘देवदास’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

अरुण आहूजा अर्थात गोविंदा. कुली नंबर 1, दुल्हे राजा, हद कर दी आपने सारखे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमा देणा-या गोविंदाने 90 च्या दशकात सगळ्यांनाच अगदी झपाटून टाकले होते. अ‍ॅक्टिंगच नाही तर त्याच्या डान्सवरही चाहते फिदा होते. त्याची ही क्रेज आजही कायम आहे. अगदी चित्रपटांत दिसत नसला तरीही. त्याकाळी गोविंदाची इतकी क्रेज होती की , संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकालाही त्याने भुरळ पाडली होती. असे नसते तर ‘देवदास’साठी त्यांनी गोविंदाला विचारलेच नसते. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण भन्साळींचा 2002 चा सुपरहिट ‘देवदास’ हा सिनेमा गोविंदाला ऑफर करण्यात आला होता.

नुकत्याच एका शोमध्ये खुद्द गोविंदाने हा खुलासा केला. त्याने सांगितले की, भन्साळींनी मला  ‘देवदास’ ऑफर केला होता. त्यांनी मला चुन्नीलालच्या भूमिकेची ऑफर दिली गेली होती. परंतु मी ही भूमिका साकारण्यास नकार दिला. याचे कारण म्हणजे, त्यावेळी मला कोणताही साईड रोल करायचा नव्हता. मी नकार दिल्यावर त्यांनी ही भूमिका जॅकी श्रॉफला देण्यात आली.’

‘त्यावेळी मी एक सुपरस्टार होतो. साईड रोल माझ्या इमेजला धक्का पोहोचू शकते, असा विचार माझ्या मनात होता. माझ्यात चुन्नीलाल कुठून दिसला? असा प्रश्न त्यावेळी मी भन्साळींना केला होता. केवळ इतकेच नाही तर शाहरूखला सांगा, तो म्हणेल तर मी ही भूमिकाही करेल. कारण आम्ही दोघांनी एकत्र काम केलेले नाही, असेही भन्साळींना म्हणालो होतो. पण हा चॅप्टर तिथेच संपला आणि भन्साळींनी माझ्या जागी जॅकी श्रॉफला घेतले, ’ असेही गोविंदाने यावेळी सांगितले.

Web Title: actor govinda on sanjay leea bhanshali devdas he said that he offered the role of chunnilal-ram