Akshay Kumar नंतर अभिनेता Govinda कोरोना पॉझीटीव्ह, झाला होम क्वॉरंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 16:15 IST2021-04-04T16:12:58+5:302021-04-04T16:15:56+5:30

Govinda Corona Positive : गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून कोरोनाची सर्व नियम पाळत घरीच उपचार घेत आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदाने सोशल मीडियावर दिली आहे.

Actor Govinda Corona positive, after Akshay Kumar, became home quarantine | Akshay Kumar नंतर अभिनेता Govinda कोरोना पॉझीटीव्ह, झाला होम क्वॉरंटाईन

Akshay Kumar नंतर अभिनेता Govinda कोरोना पॉझीटीव्ह, झाला होम क्वॉरंटाईन

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान,आर. माधवन आणि अक्षय कुमार. सर्वसामान्यांप्रमाणे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त कलाकारांची संख्या वाढतच चालली आहे. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ आता गोविंदालाही कोरोनाची लागण झाली आहे. 


गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून कोरोनाची सर्व नियम पाळत घरीच उपचार घेत आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदाने सोशल मीडियावर दिली आहे.  मला कोरोनाची लागण झाली असून माझा कोरोना चाचाणी पॉझिटिव्ह आली आहे. फार काही चिंतेचे कारण नाही. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत.

 

कुटुंबातील इतर सर्वांची कोरोन चाचणी केली असून त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती गोविंदाने चाहत्यांसह शेअर केली आहे. मी सध्या होम क्वॉरंटाईन आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशी विनंतीही गोविंदाने केली आहे. 

 

 

गोविंदा अभिनयासोबत डान्स आणि कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात खूप चाहते आहेत जे त्याच्या पोस्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गोविंदाने यादरम्यान डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तो लेक नर्मदा आहुजासोबत डान्स करताना दिसतो आहे. सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असलेल्या गोविंदाने त्याच्या मुलीसोबत डान्स करतानाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. बाप-लेकीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे.
 

Web Title: Actor Govinda Corona positive, after Akshay Kumar, became home quarantine