​टायगर श्रॉफच्या मते, रिअल हिरो कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 13:13 IST2017-01-11T13:13:00+5:302017-01-11T13:13:00+5:30

जॅकी श्रॉफचा गुणी मुलगा म्हणजे टायगर श्रॉफ. टायगरच्या आयुष्यातील रिअल हिरो कोण?  असा प्रश्न कुणी केला तर सर्वात आधी ...

According to Tiger Shroff, who is the real hero? | ​टायगर श्रॉफच्या मते, रिअल हिरो कोण?

​टायगर श्रॉफच्या मते, रिअल हिरो कोण?

की श्रॉफचा गुणी मुलगा म्हणजे टायगर श्रॉफ. टायगरच्या आयुष्यातील रिअल हिरो कोण?  असा प्रश्न कुणी केला तर सर्वात आधी तुमच्या मनात मायकेल जॅक्सनचेच नाव येणार. अर्थात हा विचारही काही चुकीचा नाही. कारण टायगर मायकेल जॅक्सनचा किती मोठा चाहता आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण टायगरच्या आयुष्यातील रिअल हिरो कोण? याचे उत्तर वेगळे आहे. टायगरच्या मते, भगवान शिव हाच रिअल हिरो आहे. होय, टायगर भगवान शिवाचा खूप मोठा भक्त आहे.

डान्स आणि अ‍ॅक्शन या दोन्ही कला मला मिळालेला भगवान शिवाचा आशीर्वाद आहे. शिव हाच या जगाचा निर्माता आणि तोच दुष्कृत्याचा विनाशक़ शिवानेच तांडव नृत्यास जन्म दिला. कुठल्याही गोष्टीत कमतरता राहू नये, कुठलीही गोष्ट अर्धवट सोडता कामा नये, याची प्रेरणा मला भगवान शिवाकडून मिळते. ही शिवशक्ती मला मानसिकदृष्ट्या प्रेरणा देते. कुठलेही अ‍ॅक्शन दृश्य असो वा स्टेजवरचा परफॉर्मन्स शिवाचे नाव घेतले की, माझ्यात एक वेगळी ऊर्जा संचारते, असे टायगर म्हणाला.

टायगर जसा जसा मोठा होत गेला, तशी तशी भगवान शिवावरची त्याची श्रद्धा अधिक वाढली. अगदी आत्ता आत्तापर्यंत टायगर दर सोमवारी भगवान शिवाचे व्रत करायचा. मात्र सध्या आपल्या बिझी शेड्यूलमुळे टायगरने सोमवारचे व्रत सोडलेयं. अर्थात व्रत सोडले असले तरी भगवान शिवावरची टायगरची श्रद्धा जराही कमी झालेली नाही. कुठल्याही नव्या कामाचा शुभारंभ टायगर सोमवारीच करतो. सोमवार हा भगवान शिवाचा दिवस आहे आणि हा दिवस टायगर स्वत:साठी शुभ मानतो.

Web Title: According to Tiger Shroff, who is the real hero?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.