‘अब्राम’ने दिली पप्पा शाहरुखला किक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 12:50 IST2016-08-16T07:13:34+5:302016-08-16T12:50:21+5:30

‘मुलाचे पाय पळण्यात दिसतात’ अशी मराठीत म्हण आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला याची चांगली प्रत्यक्ष प्रचिती आली. नुकतेच त्याने ...

'Abram' gave Pappa Shah Rukh Khan a kick | ‘अब्राम’ने दिली पप्पा शाहरुखला किक

‘अब्राम’ने दिली पप्पा शाहरुखला किक

ुलाचे पाय पळण्यात दिसतात’ अशी मराठीत म्हण आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला याची चांगली प्रत्यक्ष प्रचिती आली. नुकतेच त्याने फेसबुकवर एक फोटो शेअर करून अब्रामने त्याला लाथ मारल्याचे सांगितले. फोटोत अब्राम शाहरुखला लाथ मारतानादेखील दिसतो.

त्याचे झाले असे की, व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शाहरुख आपल्या मुलांसोबत मस्ती करत असतो. अशाच एक निवांत क्षणी अब्रामने आपले अ‍ॅक्शन कौशल्य दाखवत आपल्या इवलुशा पावलांनी पप्पांना ‘किक’ मारली. या क्षणाचा फोटो फेसबुकवर शेअर करताना त्याने लिहिले की, मुलाची पहिली लाथ वडिलांना चांगलीच लक्षात राहते.

शाहरुख अब्रामसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. त्यामुळे अब्राम इंटरनेटवर सुपरहीट आहे. लॉस एंजलिस विमानतळावर झालेल्या प्रकारानंतर रिलॅक्स होण्यासाठी शाहरुख आपल्या मुलांसोबत एन्जॉय करत आहे . लवकरच तो इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाची शुटिंग सुरू करणार आहे.

Web Title: 'Abram' gave Pappa Shah Rukh Khan a kick