अभिषेक बच्चन रूग्णालयात दाखल, जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 10:21 IST2021-08-24T10:21:12+5:302021-08-24T10:21:43+5:30

अभिषेक बच्चनला रूग्णालयात दाखल केल्याची बातमी कळताच ऐश्वर्या शूटींग सोडून रूग्णालयात पोहोचली.

Abhishek Bachchan hospitalised, father Amitabh Bachchan and sister Shweta Bachchan pay a visit at the hospital | अभिषेक बच्चन रूग्णालयात दाखल, जाणून घ्या काय आहे कारण?

अभिषेक बच्चन रूग्णालयात दाखल, जाणून घ्या काय आहे कारण?

ठळक मुद्देअभिषेक याआधीही चित्रीकरणादरम्यान जखमी झाला होता. धूम 3 च्या सिनेमाच्या शूटींगदरम्यान त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) तीन दिवसांपूर्वी पत्नी ऐश्वर्या राय व मुलगी आराध्या यांना सोडण्यासाठी विमानतळावर आला होता. यावेळी अभिषेकच्या हाताला बँडेज दिसले होते. अभिषेकचे हे फोटो क्षणात व्हायरल झाले होते. त्याला दुखापत झाल्याचे कळले होते. मात्र यानंतर परवा रात्री अभिषेकचे वडील अमिताभ व बहिण श्वेता दोघेही लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले.   त्यांच्या पाठोपाठ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन देखील त्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि मग अभिषेकला रात्री रूग्णालयात दाखल केल्याची बातमी आली. आता अभिषेकला दुखापत कशी झाली, यामागचे कारण समोर आले आहे. (Abhishek Bachchan hospitalised)

 वृत्तानुसार, अभिषेक चेन्नईत त्याच्या सिनेमाचे शूटींग करत असताना सेटवरच त्याला दुखापत झाली. त्याच्या तळहाताच्या बोटांमध्ये फ्रॅक्चर  आहे आणि डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात अद्याप बच्चन कुटुंबाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
अभिषेक हा ‘र्ओाि सेरूप्पु आकार 7’च्या हिंदी रिमेकचे शूटींग करतोय. या अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमात अभिषेक एकमेव अभिनेता असणार आहे. उर्वरित कलाकारांच्या केवळ आवाजांचा वापर करण्यात आला आहे.

अभिषेक याआधीही चित्रीकरणादरम्यान जखमी झाला होता. धूम 3 च्या सिनेमाच्या शूटींगदरम्यान त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.
ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून ‘पोन्नयिन सेलवन’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. तीन दिवसांपूर्वीच ती आराध्यासोबत या शूटींगसाठी रवाना झाली होती. मात्र अभिषेकला रूग्णालयात दाखल केल्याची बातमी ऐकून ती ताबडतोब प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचली होती.
अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो लवकरच तो ‘बॉस बिस्वास’ आणि ‘दसवीं’ या सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘द बिग बूल’ ओटीटीवर रिलीज झाला होता.

Web Title: Abhishek Bachchan hospitalised, father Amitabh Bachchan and sister Shweta Bachchan pay a visit at the hospital