संजय लीला भंसालींच्या चित्रपटात दिसणार अभिषेक बच्चन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 11:26 IST2017-05-12T05:56:48+5:302017-05-12T11:26:48+5:30

संजय लीला भंसाली यांनी आतपर्यंत अनेक रोमाँटिक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सध्या ते त्यांच्या महत्त्वकांक्षी पद्ममावती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त ...

Abhishek Bachchan to appear in Sanjay Leela Bhansali's film? | संजय लीला भंसालींच्या चित्रपटात दिसणार अभिषेक बच्चन ?

संजय लीला भंसालींच्या चित्रपटात दिसणार अभिषेक बच्चन ?

जय लीला भंसाली यांनी आतपर्यंत अनेक रोमाँटिक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सध्या ते त्यांच्या महत्त्वकांक्षी पद्ममावती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. पद्ममावतीनंतर संजय लीला भंसाली आणखीन एक रोमाँटिक चित्रपट घेऊन येत असल्याची माहिती मिळतेय. या चित्रपटात आपल्याला अभिषेक बच्चन ही दिसणार आहे. अभिषेकबरोबर प्रियांका चोप्रा ही या चित्रपटाचा भाग असल्याचे समजते आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित रॉय करणार आहे तर निर्माती संजय लीला भंसाली.  

याआधी रोहित रॉयने एक शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे.  याचित्रपटाचे नाव राइस प्लेट होते. 10 मिनिटांच्या या फिल्ममध्ये वेगवेगळ्या 10 स्टोरी होत्या. रोहित आता संजय लीला भंसालीच्या प्रेम कथेवर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. रोहित सांगतो, या चित्रपटाबाबत माझे अभिषेक बच्चनशी बोलणे सुरु आहे.  त्याने या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे पण अजून बऱ्याच गोष्टींवर चर्चा होणे बाकी आहे. तसेच प्रियांका या चित्रपटाचा हिस्सा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ती संजय लीला भंसाली यांच्याबरोबर दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे. याबरोबर रोहितने हेही स्पष्ट केले आहे तो शायर साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करत नाही आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2016मध्ये आलेल्या हाऊसफुल्ल 3 चित्रपटात अभिषेक आपल्याला दिसला होता. अभिषेक पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार हे बातमी वाचून त्याच्या फॅऩ्सना आनंद झाल्याशिवया राहाणार नाही. आता या चित्रपटाचे शूटिंग नेमके कधी सुरु होणार याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही. 

Web Title: Abhishek Bachchan to appear in Sanjay Leela Bhansali's film?