'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये अभिषेक बच्चन व इलियाना डिक्रुझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 12:44 IST2018-08-28T12:40:24+5:302018-08-28T12:44:14+5:30

तब्बल अकरा वर्षानंतर आता 'लाइफ इन मेट्रो' या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Abhishek Bachchan and Iliana Dikruz in the sequel of 'Life in Metro' | 'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये अभिषेक बच्चन व इलियाना डिक्रुझ

'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये अभिषेक बच्चन व इलियाना डिक्रुझ

ठळक मुद्दे'लाइफ इन मेट्रो' २००७ साली झाला प्रदर्शित'लाइफ इन मेट्रो'मध्ये करिना कपूर, सैफ अली खान, राजकुमार राव

२००७ साली प्रदर्शित झालेला 'लाइफ इन मेट्रो' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यात शिल्पा शेट्टी, शायनी आहुजा, कोंकणा सेन शर्मा, कंगणा राणौत, शर्मन जोशी आणि इरफान खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. तसेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी त्यावेळी प्रचंड हिट झाली होती. आता या चित्रपटाचा सिक्वल येणार असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार या सिक्वलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

तब्बल अकरा वर्षानंतर आता 'लाइफ इन मेट्रो' या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिना कपूर, सैफ अली खान, राजकुमार राव या कलाकारांची या चित्रपटात वर्णी लागली आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अभिषेक बच्चन व इलियानाचीही एन्ट्री होणार आहे. बऱ्याच काळापासून इलियाना चित्रपटांपासून लांब आहे. या बातमीला अद्याप या दोघांनीही दुजोरा दिला नाही, पण या चित्रपटाची प्राथमिक कथा त्यांना आवडली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या चित्रपटासाठी इलियानाही उत्सुक आहे. अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांना या सिक्‍वेलसाठी विचारण्यात आले होते.


मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता अभिषेक आणि इलियानाकडे ही ऑफर आली आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर दिग्दर्शक अनुराग बसु सध्या काम करत आहेत. 'लाईफ इन मेट्रो'चा हा सिक्वेल पुढील वर्षी प्रदर्शित होईल.
'लाइफ इन अ मेट्रो' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये आणखीन कोण कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

Web Title: Abhishek Bachchan and Iliana Dikruz in the sequel of 'Life in Metro'