अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:13 IST2025-12-31T16:11:09+5:302025-12-31T16:13:12+5:30
एका चाहतीने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यासोबत फोटो शेअर केला आहे.

अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
बॉलिवूड कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. मधल्या काळात दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. अगदी घटस्फोटापर्यंतही गोष्टी गेल्या होत्या. ऐश्वर्या अनेक इव्हेंट्सला आराध्यासोबत एकटीच दिसायची तर अभिषेक बच्चन आईवडिलांसोबत असायचा. मात्र एक दिवस अभिषेकने या सर्व अफवा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. आता दोघंही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला गेले आहेत. त्यांच्या व्हेकेशनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका चाहतीने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यासोबत फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्याने उबदार कपडे घातले आहेत. कानटोपी आणि जाड जॅकेट घातलं आहे. तर अभिषेकनेही जॅकेट आणि कॅप घातली आहे. याचा अर्थ दोघंही परदेशात कुठेतरी थंड हवेच्या प्रदेशात आहेत. चाहतीने 'हॅपी न्यू इयर' म्हणत हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक आनंदाने चाहतीला फोटो देत आहेत.
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १८ वर्ष झाली आहेत. २० एप्रिल २००७ मध्ये त्यांचं लग्न झालं. मुंबईतच बच्चन कुटुंबाच्या प्रतिक्षा बंगल्यातच त्यांचा विवाहसोहळा पार पडला. जवळच्या नातेवाईक मित्रपरिवाराच्या उपस्थितीतच त्यांचं लग्न झालं होतं. २०११ मध्ये ऐश्वर्याने लेकीला आराध्याला जन्म दिला.