​-अन् कपिलच्या शोमध्ये अभय संतापला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 16:19 IST2016-07-26T10:49:25+5:302016-07-26T16:19:25+5:30

अभय देओल तसा कूल अभिनेता. पण कधी कधी तोही संतापतो. असेच काहीसे एका कॉमेडी शोच्या सेटवर झाले. ‘हॅपी भाग ...

Abhay angry at Kapil's show! | ​-अन् कपिलच्या शोमध्ये अभय संतापला!

​-अन् कपिलच्या शोमध्ये अभय संतापला!

य देओल तसा कूल अभिनेता. पण कधी कधी तोही संतापतो. असेच काहीसे एका कॉमेडी शोच्या सेटवर झाले. ‘हॅपी भाग जाएगी’च्या प्रमोशनसाठी अभय चित्रपटाच्या कास्टसोबत ‘दी कपिल शर्मा’च्या सेटवर पोहोचला. येथील खराब अरेंजमेंट पाहून अभय जाम भडकला. कपिलच्या शोची शूटींग संपवून अभयला ट्रेलर लाँचसाठी जायचे होते. मात्र शोदरम्यान मीडियाशी बोलण्यातच इतका वेळ गेला की, अभयला उशीर झाला. एवढेच नाही तर शूटींगदरम्यान अभयला कॉफी हवी होती. पण तीही मिळाली नाही. यामुळे तर अभयचा पारा जरा जास्तच चढला. ‘हॅपी भाग जाएगी’ अभयसाठी महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे अभय तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे. यामुळे थोडे टेन्शन स्वाभाविक आहे. पण तरिही कॉमेडी शोमध्ये जाऊन संतापणे म्हणजे थोडे विचित्रच म्हणायला हवे..सो, कूल डाऊन अभय..!!

Web Title: Abhay angry at Kapil's show!