आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटातील मजेशीर ट्रॅक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:00 IST2018-09-20T17:55:12+5:302018-09-20T18:00:20+5:30

‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून यात आयुषमान खुरानासोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Aayushman Khurana's upcoming movie Badhai Ho Title track released | आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटातील मजेशीर ट्रॅक रिलीज

आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटातील मजेशीर ट्रॅक रिलीज

ठळक मुद्दे 'बधाई तेनू' हे टायटल ट्रॅक प्रदर्शित 'बधाई तेनू' या टायटल ट्रॅकला मिळतेय पसंती

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट 'बधाई हो'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांना खूप भावला. नुकतेच 'बधाई तेनू' हे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले आहे. ट्रेलरप्रमाणेच याचे टायटल ट्रॅकही तेवढेच मजेशीर आहे. 

'बधाई हो' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात घरात एक गोंडस पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या डायलॉगपासून होते. हा डायलॉग सामान्य जरी असला, तरी चित्रपटात तो वेगळ्याप्रकारे दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेवढा हसवणारा आहे, त्याचप्रकारे या टायटल ट्रॅकमध्येही अनेक गमती जमती पाहायला मिळतात. या चित्रपटात चक्क आयुष्मानची आई गरोदर होते. यावेळी त्याच्या कुटुंबाची कशी फजिती उडते आणि आयुष्मानवर कसा शुभेच्छांचा वर्षाव होतो, याचे मजेदार किस्से या गाण्यात पाहायला मिळतात. या मजेदार टायटल ट्रॅकला सोशल मीडियावर प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते आहे. 

जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनित जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या ‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शक असून, आयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विनोदी धाटणीचा कौटुंबिक चित्रपट म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.
 

Web Title: Aayushman Khurana's upcoming movie Badhai Ho Title track released