आराध्या बच्चनने तिच्या मैत्रिणीच्या मनातील ‘ही’ भीती केली दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 21:07 IST2018-01-05T15:36:41+5:302018-01-05T21:07:00+5:30

अभिषेक-ऐशची मुलगी आराध्या बच्चन सध्या मीडियाचा सामना करणे शिकली आहे. जेव्हा तिची मैत्रिण मीडिया फोटोग्राफर्सला बघून घाबरली तेव्हा तिने तिच्या मनातील भीती दूर केली.

Aaradh Bachchan feared 'This' fear of her friend! | आराध्या बच्चनने तिच्या मैत्रिणीच्या मनातील ‘ही’ भीती केली दूर!

आराध्या बच्चनने तिच्या मैत्रिणीच्या मनातील ‘ही’ भीती केली दूर!

ही दिवसांपूर्वीच अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन मुलगी आराध्या घेऊन त्यांच्या मित्रांसोबत डिनर पार्टीसाठी मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेले होते. याबाबतची भनक जेव्हा मीडियाला लागली तेव्हा बरेचसे मीडिया प्रतिनिधी आणि फोटोग्राफर्स बच्चन फॅमिलीची छबी टिपण्यासाठी रेस्टॉरंटबाहेर पोहोचले होते. त्यातच अभिषेक-ऐशसोबत आराध्या असल्याने फोटोग्राफर्सला तिची छबी टिपण्याची जणू काही ओढ लागली होती. 

डेक्कन क्रॉनिकलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, जेव्हा आराध्या आणि तिची मैत्रिण रेस्टॉरंटबाहेर येत होते, तेव्हा समोर असलेल्या मीडिया फोटोग्राफर्सला बघून आराध्याची मैत्रिण प्रचंड घाबरली. तिला काहीच सूचत नव्हते. भीतीपोटी ती तिच्या पॅरेंट्सच्या पाठीमागे जाऊन लपली. जेव्हा ही बाब आराध्याने नोटीस केली तेव्हा लगेचच ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. तसेच घाबरण्याचे काहीही कारण नाही असे ती तिला सांगू लागली. 



यानंतर परताना आराध्याने मीडियाला स्माइल देत काही पोझही दिल्या. त्यानंतर ती तेथून निघून गेली. आराध्याने तिच्या मैत्रिणीच्या मनातील भीती दूर केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. वास्तविक आराध्या लहानपणापासूनच पापराजीचा सामना करते आहे. त्यामुळे फोटोग्राफर्सला कसे हॅण्डल करावे, हे तिला कळून चुकले आहे. 
 

याअगोदरदेखील जेव्हा ऐश्वर्या आई वृंदा आणि मुलगी आराध्यासोबत वडील कृष्णा राज राय यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईतील एका चॅरेटी फाउंडेशनच्या इव्हेंटमध्ये पोहोचली होती, तेव्हा मीडियाच्या वर्तणुकीमुळे ऐशच्या डोळ्यात अश्रू आले होते. परंतु आराध्याने तिच्या मॉमला समजावून सांगितले होते. 

Web Title: Aaradh Bachchan feared 'This' fear of her friend!