लग्नाआधीच बॉयफ्रेंडसह राहते आमिर खानची मुलगी इरा खान,नवीन व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:12 IST2021-03-10T17:06:17+5:302021-03-10T17:12:24+5:30

Ira Khan Confirm Relationship With Nupur Shikhare : इरा खान आणि नुपूर शिखरे लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली होती.

Aamir Khan's daughter Ira Khan, who lives with her boyfriend Nupur Shikhare Before Marriage, came up with a new video | लग्नाआधीच बॉयफ्रेंडसह राहते आमिर खानची मुलगी इरा खान,नवीन व्हिडीओ आला समोर

लग्नाआधीच बॉयफ्रेंडसह राहते आमिर खानची मुलगी इरा खान,नवीन व्हिडीओ आला समोर

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खाननेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. नुकतेच व्हॅलेटाईन डेच्या दिवशी तिने आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह प्रेमात असल्याचे जाहीर केले होते. अनेकदा ती नूपूरसोबत विविध अंदाजातील फोटो शेअर करते. इरा नूपूरची खूप काळजी घेते. नुकताच नूपूरची हेअरकटींग करतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 इरा खान आणि नुपूर शिखरे लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली होती. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊस इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करताना दिसले होते. 

दोघेही एकमेकांच्या आईला भेटले आहेत. या नात्यासाठी इरा आणि नूपूर दोघेही फार सिरिअस आहेत.आतापर्यंत आमीर खानची पहिली पत्नी आणि इरा खानची आई रीना दत्ता यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु इरा खान नुपूरच्या आईच्या पोस्टवर नेहमीच कमेंट करत असल्याचे पाहायला मिळते. एकंदरितच इरा नुपूरच्या कुटुंबासह चांगले बॉन्डींग बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. नुपूर इराच्या चुलत भावाच्या लग्नालाही गेला होता.

वयाच्या १४व्या वर्षी लैंगिक अत्याचार 

मी 14 वर्षांचा असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळी काय घडत आहे हे मला माहित नव्हते, परंतु जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले. होय, मला असं वाटलं की, माझ्याबरोबर असं का होऊ दिलं, पण मी आयुष्यातला हा इतका मोठा धक्का मानला नव्हता की मी नैराश्यात जाईन.मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माझ्या मित्रांना आणि पालकांना सांगू शकते, परंतु काय सांगावे. ते मला काय विचारणार? तर मी काय सांगू.

 

माझ्यासोबत काही वाईट घडलेच नाही असं मी अनुभवत आहे. या विचारसरणीने मला त्यांच्याशी बोलण्यास थांबवले आहे आणि दूर ठेवले आहे." तसेच  इराने शेअर केलेल्या  व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले असल्याचे सांगत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

Web Title: Aamir Khan's daughter Ira Khan, who lives with her boyfriend Nupur Shikhare Before Marriage, came up with a new video