या सुपरस्टारच्या मुलीने केले हॉट अँड बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून विसराल बॉलिवूडच्या अभिनेत्रींना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 14:47 IST2019-12-16T14:45:15+5:302019-12-16T14:47:38+5:30

या अभिनेत्याची मुलगी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

aamir khan's daughter Ira Khan slays in a thigh-high slit gown | या सुपरस्टारच्या मुलीने केले हॉट अँड बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून विसराल बॉलिवूडच्या अभिनेत्रींना

या सुपरस्टारच्या मुलीने केले हॉट अँड बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून विसराल बॉलिवूडच्या अभिनेत्रींना

ठळक मुद्देइराने या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा गाऊन घातला असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या हॉट अँड बोल्ड लूकची सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमेऱ्यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. होय, इराने स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केलेत. या फोटोमधील इराचा हॉट अंदाज पाहून चाहते तर अक्षरश: थक्क झालेत.

इराने या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा गाऊन घातला असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या हॉट अँड बोल्ड लूकची सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत असून तिच्या या ग्लॅमरस लूकची सगळीकडे चर्चा होत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. त्यानुसार इराने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'Euripides Medea' हे नाटक ती दिग्दर्शित करणार आहे. या नाटकातून युवराज सिंगची पत्नी हेजल किच अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत कमबॅक करतेय.

Web Title: aamir khan's daughter Ira Khan slays in a thigh-high slit gown