आमिर खानच्या ‘दंगल’ पार्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 15:19 IST2017-02-04T09:49:55+5:302017-02-04T15:19:55+5:30

आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची सक्सेस पार्टीचे अद्याप आयोजनही करण्यात ...

Aamir Khan's 'Dangal' party talks in Bollywood | आमिर खानच्या ‘दंगल’ पार्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा!

आमिर खानच्या ‘दंगल’ पार्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा!

िर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची सक्सेस पार्टीचे अद्याप आयोजनही करण्यात आले नाही हे विशेष. मात्र आता निर्मात्यांनी याची तयारी केली असून आमिर खान व सिद्धार्थ रॉय कपूर एका धमाकेदार पार्र्टीचे आयोजन करण्यार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पार्टी ‘दंगल’ सारखीच जबरदस्त असेल यात शंकाच नाही. 

सध्या या पार्टीच्या बातम्या बॉलिवूडमध्ये चांगल्याच व्हायरल होत आहे. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सामान्यत: बॉलिवूड पार्टीजपासून दूर असणारा आमिर पार्टी आयोजित करीत असल्याने उत्सुक ता लागली आहे. शिवाय ही पार्टी धमाकेदार असेल असे सांगण्यात येत आहे. आमिरने ही पार्टी त्याच्या मित्रांच्या आग्रहाखातर आयोजित केली असल्याचे सांगण्यात येते. 



आमिर खान अभिनित ‘दंगल’ हा चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स आॅफिसवर ३८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ३५० कोटीहून अधिक कमाई करणारा ‘दंगल’ हा आमिरचा दुसरा चित्रपट असून यापूर्वी त्याच्या ‘पीके’ने हा माईलस्टोन पार केला होता. दंगल रिलीज होऊन सहा आठवडे झाले असले तरी या चित्रपटाचे कलेक्शन अजुनही सुरूच आहे. यामुळे निर्माते व चित्रपटगृह मालक देखील आनंदी आहेत. विशेष म्हणजे आजही सिंगल स्क्रिनवर हा चित्रपट चांगला सुरू आहे. लवकरच हा चित्रपट ४०० कोटीमचा आकडा पार करेल असे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास ४०० कोटी रुपये कमविणारा ‘दंगल’ हा पहिला चित्रपट असेल. 

पहेलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कथेला आमिर खानने अतिशय रंजक व तितक्याच धीर गंभीर पद्धतीने चित्रीत केले आहे. या चित्रपटाची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. 

Web Title: Aamir Khan's 'Dangal' party talks in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.