आमिर खान चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज! फक्त काही तासांची प्रतीक्षा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 13:17 IST2018-03-27T07:47:33+5:302018-03-27T13:17:33+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सतत काहीतरी वेगळे करत असतो. येत्या काही तासांत आमिर चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येतोय.

आमिर खान चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज! फक्त काही तासांची प्रतीक्षा!!
ब लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सतत काहीतरी वेगळे करत असतो. येत्या काही तासांत आमिर चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज घेऊन येतोय. होय, खुद्द आमिरने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत आमिरने त्याच्याकडे चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज असल्याचे म्हटले आहे. साहजिकच या व्हिडिओनंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘२७ मार्चला संध्याकाळी साडे चार वाजता मी फेसबुकवर लाईव्ह असेल. एक खास गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायचीयं,’असे आमिर या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. त्यामुळेच आमिर कुठले सरप्राईज देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटानंतर आमिर खान ‘महाभारत’ या बिग बजेट सिनेमात दिसणार,अशी बातमी सध्या चर्चेत आहे. या प्रोजेक्टसाठी मुकेश अंबानी १ हजार कोटींची गुंतवणूक करणार आणि या चित्रपटात आमिर खान कृष्णाची भूमिका साकारणार, अशीही चर्चा आहे. याच चित्रपटामुळे आमिरने अंतराळवीर राकेश शर्मा याच्या बायोपिकमध्ये काम करण्यास नकार दिला, असे मानले जात आहे. आमिर आज देणार असलेले सरप्राईज याबद्दल तर नाही ना, असा प्रश्न त्यामुळे विचारला जातोय. तूर्तास तरी कुठलाही अंदाज बांधणे कठीण आहे. आमिर ‘महाभारत’ची घोषणा करणार की ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल काही महत्त्वाची बातमी शेअर करणार, हे आता आज संध्याकाळीचं कळणार. तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच...
गत १४ मार्चला आपल्या वाढदिवशी आमिरने इन्स्टाग्रामवर एन्ट्री करत, चाहत्यांना एक अनोखी भेट दिली होती. इन्स्टाग्रामवरील आपल्या पहिल्या पोस्टमध्ये त्याने आईचे स्केच शेअर केले होते.
ALSO READ : आमिर खानच्या ‘कृष्ण’ साकारण्यावरून वाद! एका ट्वीटने सुरु झाले ‘महाभारत’!!