लेकीच्या लग्नात आमिर खान झाला होता भावुक, 'बाबुल की दुआएं' गातानाचा व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 11:20 IST2024-06-17T11:17:35+5:302024-06-17T11:20:22+5:30

Ira Khan : फादर्स डेच्या निमित्ताने आयरा खानने तिच्या लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान खूपच भावूक दिसत आहे.

Aamir Khan was emotional at daughter Ira Khan wedding, the video of him singing 'Babul Ki Duaen' came out | लेकीच्या लग्नात आमिर खान झाला होता भावुक, 'बाबुल की दुआएं' गातानाचा व्हिडिओ आला समोर

लेकीच्या लग्नात आमिर खान झाला होता भावुक, 'बाबुल की दुआएं' गातानाचा व्हिडिओ आला समोर

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान(Aamir Khan)ची मुलगी आयरा खान(Ira Khan)ने या वर्षी बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत लग्न केले. या जोडप्याच्या लग्नात आमिर खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने खूप एन्जॉय केले. १६ जून रोजी फादर्स डेच्या निमित्ताने आयरा खानने तिच्या लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान खूपच भावूक दिसत आहे.

आयरा खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लग्नाचा चार मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान संगीत समारंभात पाहुण्यांचे स्वागत करताना दिसत आहे. आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नात भरपूर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतो की त्याची मुलगी आयरा खूप लवकर मोठी झाली आहे आणि गेल्या काही वर्षांत त्याला त्याच्या मुलीकडून खूप काही शिकायला मिळाले आहे.

मुलीच्या लग्नात आमिर खान झाला होता भावुक 
आयराच्या लग्नात आमिर खानसह त्याची एक्स पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांनीही परफॉर्म केले होते. व्हिडिओमध्ये आमिर खान 'फूलों का तारों का' आणि 'आ छलके तुझे' गाताना दिसत आहे. त्याचवेळी समोर बसलेल्या आयरा आणि नुपूर त्याला चिअर करत आहेत. पण जेव्हा आमिर खान संगीत सेरेमनीत ‘बाबुल की दुआं लेती जा’ गाताना भावुक झालेला दिसला. आयरा खान आणि नुपूर शिखरेने या वर्षी जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली.

या चित्रपटात दिसणार आमिर खान 
आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. याआधी त्याने एक्स पत्नी किरण रावसोबत 'लापता लेडीज' हा चित्रपट बनवला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला. आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिरच्या 'सितारे जमीन पर'मध्ये जेनेलिया डिसूझाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

Web Title: Aamir Khan was emotional at daughter Ira Khan wedding, the video of him singing 'Babul Ki Duaen' came out