आमिर खानने सोशल मीडिया का सोडला? ‘या’ व्हिडीओत मिळेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:02 PM2021-03-17T14:02:26+5:302021-03-17T14:02:38+5:30

मीडियाच्या फोटोग्राफर्सनी आमिरला त्याच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयामागचे कारण विचारले. यावर मिस्टर परफेक्शनिस्टने त्याच्या अंदाजात उत्तर दिले.

aamir khan tells why he quit social media | आमिर खानने सोशल मीडिया का सोडला? ‘या’ व्हिडीओत मिळेल उत्तर

आमिर खानने सोशल मीडिया का सोडला? ‘या’ व्हिडीओत मिळेल उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देआमिर खानने त्याच्या वाढदिवसाच्या दुस-या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी सिनेमापेक्षा सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाच्या दुस-याच दिवशी आमिरने सोशल मीडियाला अलविदा म्हणत, ट्विटर, इन्स्टाग्रामला रामराम ठोकला होता. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला होता. आमिरने अचानक सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय का घेतला, हे कळायला मात्र मार्ग नव्हता. पण आता या कारणांचा खुलासा झाला आहे. आमिरने स्वत: सोशल मीडिया सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मीडियाच्या फोटोग्राफर्सनी आमिरला त्याच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयामागचे कारण विचारले. यावर मिस्टर परफेक्शनिस्टने त्याच्या अंदाजात उत्तर दिले. ‘तुम्ही यावर जास्त डोके खर्च करू नका. मी माझ्यात धुंदीत असतो, सोशल मीडियावर होतोच कुठे मी? तसाही तिथे नव्हतो, मी माझ्यातच मस्त असतो, असे मला वाटले. मी अलविदा म्हटलेले नाही. मी कुठेच जात नाहीये. मी इथेच असणार आहे. आधीपण मी मीडियाद्वारेच चाहत्यांशी बोलायचो. आता मीडियाची भूमिका वाढली आहे. कारण चाहत्यांशी आणि प्रेक्षकांशी मी मीडियाच्या माध्यमातूनच बोलणार आहे,’ असे आमिर म्हणाला.

आमिरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
आमिर खानने त्याच्या वाढदिवसाच्या दुस-या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.  ‘माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे की, ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट असणार आहे. तसाही मी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो आणि आता मी सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचे ठरवले आहे. आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर माझ्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आपण पूर्वी ज्याप्रकारे संवाद साधत होतो, त्याप्रमाणे पुढे देखील मी तुमच्या संपर्कात असणार आहे,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते.

Web Title: aamir khan tells why he quit social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.