पहिल्या लग्नाचा आमिरला होतोय पश्चाताप? म्हणाला- "रीनाशी मी घाईघाईत लग्न केलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:47 IST2025-06-02T11:47:01+5:302025-06-02T11:47:29+5:30

आमिरने पहिली पत्नी रीना दत्ताबद्दल भाष्य केलं. घाईघाईत लग्न केल्याचंही आमिरने सांगितलं. याचा पश्चाताप होत असल्याचंही तो म्हणाला. 

aamir khan talk about marriage with reena dutta said i was only 21 years old | पहिल्या लग्नाचा आमिरला होतोय पश्चाताप? म्हणाला- "रीनाशी मी घाईघाईत लग्न केलं..."

पहिल्या लग्नाचा आमिरला होतोय पश्चाताप? म्हणाला- "रीनाशी मी घाईघाईत लग्न केलं..."

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यस्त आहे. 'सितारे जमीन पर'च्या निमित्ताने आमिर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने आयुष्यातील चुकांबद्दल भाष्य केलं. या मुलाखतीत आमिरने पहिली पत्नी रीना दत्ताबद्दल भाष्य केलं. घाईघाईत लग्न केल्याचंही आमिरने सांगितलं. याचा पश्चाताप होत असल्याचंही तो म्हणाला. 

आमिरने नुकतीच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या चुकांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, "मी आयुष्यात एक नाही अनेक चुका केल्या. पण, मी आज जो कोणी आहे, ते फक्त माझ्या यशामुळे नसून माझ्या चुकांमुळेही आहे. मी एक खूप साधी गोष्ट सांगतो. मी आणि रीनाने खूप घाईत लग्न केलं. मी तेव्हा २१ वर्षांचा होतो तर रीना १९ वर्षांची होती. १४ मार्चला मी २१ वर्षांचा झालो. त्यानंतर एक महिन्याची नोटीस होती. त्यानंतर कायदेशीररित्या लग्न करण्यासाठी जो पहिला दिवस होता त्या दिवशी १८ एप्रिलला मी आणि रीनाने लग्न केलं". 

"लग्नाआधी एकमेकांना आम्ही फक्त ४ महिने ओळखत होतो. त्यातही आम्ही एकमेकांसोबत फार कमी वेळ घालवला होता. एकमेकांवर आमचं खूप प्रेम होतं म्हणूनच आम्ही लग्न केलं. पण, आज मला वाटतं की लग्नाचा निर्णय हा विचार करूनच घेतला पाहिजे. त्यावेळी तारुण्यात तुम्हाला अनेक गोष्टी समजत नाहीत. पण, नंतर तुम्हाला त्याची जाणीव होते. रीनासोबत माझं आयुष्य चांगलं गेलं. त्यामुळे रीनाची चूक होती, असं नाही. माझं असं म्हणणं अजिबातच नाही. रीना एक चांगली व्यक्ती आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. पण, कोणीही इतक्या लवकर, कमी वयात आणि इतक्या घाईगडबडीत एवढा मोठी निर्णय नाही घेतला पाहिजे. पण, तेव्हा जर मी तसं केलं नसतं तर आज तुमच्या समोर इथे बसलेलो नसतो", असंही आमिर म्हणाला.

करिअरसोबतच आमिर चर्चेत असतो ते त्याच्या पर्सनल लाइफमुळे. रीना दत्ताशी घटस्फोटानंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं होतं. मात्र त्या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर आता गौरी स्प्रॅट या त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Web Title: aamir khan talk about marriage with reena dutta said i was only 21 years old