'सितारे जमीन पर'च्या शूटींगला सुरुवात, आमिर - जिनिलीयाचा क्यूट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 19:12 IST2024-03-19T19:10:52+5:302024-03-19T19:12:04+5:30

आमिर - जिनिलीयाचा 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या शुटींगमधला पहिला फोटो व्हायरल झालाय

aamir khan sitaare zameen par shooting photo viral with genelia deshmukh | 'सितारे जमीन पर'च्या शूटींगला सुरुवात, आमिर - जिनिलीयाचा क्यूट फोटो व्हायरल

'सितारे जमीन पर'च्या शूटींगला सुरुवात, आमिर - जिनिलीयाचा क्यूट फोटो व्हायरल

आमिर खानने काही महिन्यांपुर्वी 'सितारे जमीन पर' सिनेमाची घोषणा केली. 'तारे जमीन पर' नंतर आमिर पुन्हा एकदा 'सितारे जमीन पर' च्या माध्यमातून एका संवेदनशील विषयाला स्पर्श करणार आहे. आमिरचा याआधीचा 'लाल सिंग चढ्ढा' फ्लॉप झाल्याने आमिर आणि त्याच्या फॅन्सला 'सितारे जमीन पर' सिनेमाकडून खुप अपेक्षा आहेत. अशातच 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल झालाय.

'सितारे जमीन पर' सिनेमाशी संबंधित व्हायरल फोटोमध्ये पाहायला मिळतं की, आमिरने ब्लॅक रंगाचं टीशर्ट आणि जिन्स परिधान केली आहे. तर जिनिलीया सुद्धा पांढऱ्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसत आहे. दोघांचा कॅज्युअल अंदाज पाहायला मिळतोय. दोघेही एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारताना दिसत आहेत. आमिर - जिनिलीया या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनाही आनंद झालेला दिसतोय. 

'सितारे जमीन पर' बद्दल सांगायचं तर.. हा सिनेमा डाऊन सिंड्रोम सारख्या संवेदनशील विषयाला हात घालणार आहे. डाऊन सिंड्रोम झालेल्या माणसांना समाजात समान वागणूक मिळावी म्हणून हा सिनेमा आवाहन करणार आहे. सिनेमात जिनिलीया प्रमुख भूमिकेत आमिर विशेष भूमिकेत झळकणार आहे. २०२४ च्या अखेरीस हा सिनेमा मोठ्या पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

Web Title: aamir khan sitaare zameen par shooting photo viral with genelia deshmukh