आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा 'या' हॉलिवूड कलाकृतीचा रिमेक? नेटकऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:15 IST2025-05-14T11:13:59+5:302025-05-14T11:15:51+5:30

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा हा एका हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे, असं बोललं जातंय. त्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे

Aamir Khan sitaare zameen par is remake of hollywood movie champion | आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा 'या' हॉलिवूड कलाकृतीचा रिमेक? नेटकऱ्यांमध्ये चर्चा

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा 'या' हॉलिवूड कलाकृतीचा रिमेक? नेटकऱ्यांमध्ये चर्चा

 'सितारे जमीन पर' सिनेमाची (sitaare zameen par) सध्या चांगलीच उत्सुकता आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान (aamir khan) या सिनेमात बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. बास्केटबॉल कोच बनून आमिर दिव्यांग मुलांना शिकवताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर नेटकऱ्यांनी  'सितारे जमीन पर' हा रिमेक आहे असा शोध लावला आहे.  'सितारे जमीन पर' कोणत्या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे, जाणून घ्या.

या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे  'सितारे जमीन पर' 

 'सितारे जमीन पर' सिनेमाचा ट्रेलर पाहून हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे असं अनेकांना वाटलं. पण असं नाही,  'सितारे जमीन पर' हा सिनेमा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. 'चॅम्पियन' असं या सिनेमाचं नाव. पुढे २०१३ साली याच नावावर आधारीत हॉलिवूड सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'चॅम्पियन' सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, 'सितारे जमीन पर'  हा या सिनेमाचा रिमेक आहे. याआधीही हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' सिनेमावर आधारीत आमिरने 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमा बनवला होता. 

'सितारे जमीन पर' कधी रिलीज होणार

‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून अमिताभ भट्टाचार्य यांनी गाणी लिहिली आहेत. चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहेत. २० जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आमिर खान प्रोडक्शन्स या सिनेमाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करत आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. 'सितारे जमीन पर'चं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे.

Web Title: Aamir Khan sitaare zameen par is remake of hollywood movie champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.