PK सिनेमामुळे बदललं दिल्लीतील भिकाऱ्याचं नशीब; आज आहे एका दुकानाचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 08:55 AM2024-04-12T08:55:51+5:302024-04-12T08:58:05+5:30

Aamir khan: दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला मनोजने आज स्वत:च्या पायावर त्याचं घर चालवत आहे.

aamir-khan-pk-beggar-role-manoj-roy-life-changed-after-this-film | PK सिनेमामुळे बदललं दिल्लीतील भिकाऱ्याचं नशीब; आज आहे एका दुकानाचा मालक

PK सिनेमामुळे बदललं दिल्लीतील भिकाऱ्याचं नशीब; आज आहे एका दुकानाचा मालक

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. या सुपरस्टारच्या लिस्टमध्ये रजनीकांतपासून (rajanikanth) जॅकी श्रॉफपर्यंत अनेक दिग्गज  कलाकारांचा समावेश आहे. एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करणारा रजनीकांत आज टॉलिवूडचा थलायवा म्हणून ओळखला जातो. तर, झोपडपट्टीत राहणारा जॅकी श्रॉफ बॉलिवूडचा दादा झाला आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर अशा एका  व्यक्तीची चर्चा रंगली आहे ज्याचं आयुष्य आमिर खानच्या 'पीके' या सिनेमामुळे बदललं.

आमिर खानचा PK हा सिनेमात तर सगळ्यांच्याच लक्षात असेल. या सिनेमात आमिरचा ब्रीजवरचा एक सीन होता. या सीनमध्ये त्याच्यासोबत एक भिकारी दिसून आला होता. या भिकाऱ्याची भूमिका मनोज रॉय याने साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे त्याचं नशीब बदललं. ५ सेकंद केलेल्या या रोलमुळे तो आज रंकाचा राव झाला आहे.

PK सिनेमात दिसलेला मनोज रॉय खऱ्या आयुष्यात दिल्लीतील जंतरमंतर येथे भीक मागून त्याचं घर चालवत होता. परंतु, त्याच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट आला ज्यामुळे त्याचं नशीब बदललं. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं आहे. 
मी जंतरमंतर येथे असतांना एकदा दोन जण माझ्या जवळ आले आणि तू अॅक्टिंग करु शकतोस का? असं विचारलं. त्यावर मी इथे अंधळा असल्याची अॅक्टींग करुनच भीक मागतोय असं मी त्यांना सांगितलं ज्यावर ते थक्क झाले होते, असं मनोजने त्यांना सांगितलं.

मनोजरचे वडील मजदुरी करुन कुटुंब चालवत होते. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मनोज कामाच्या शोधात दिल्लीत आला. पण, इथेही त्याला काहीच काम मिळालं नाही. त्यामुळे मग त्याने अंधळ्याची अॅक्टिंग करत भीक मागायला सुरुवात केली. त्यानंतर इथे आल्यावर त्याला अभिनयाविषयी विचारणाऱ्या २ व्यक्तींनी २० रुपये दिले आणि सोबत त्यांचा फोन नंबरही दिला.

मनोजला पीके सिनेमाच्या ऑडिशनसाठी नेहरु स्टेडिअम येथे बोलावलं होतं त्याच्यासोबत अन्य ७ भिकारीदेखील ऑडिशनसाठी होते. परंतु, या  सगळ्यातून मनोजची निवड झाली. मात्र, हे ऑडिशन पूर्ण होत असतांना मनोजच्या डोक्यात फक्त इतकाच विचार होता की त्याला आता ती निदान २ वेळचं पोटभर जेवण मिळावं.

दरम्यान, 'पीके' सिनेमामुळे रातोरात त्याचं नशीब बदललं. आज तो रस्त्यावर भीक मागण्याचं काम सोडून स्वत:चं दुकान चालवतोय. पीके सिनेमानंतर मनोज त्याच्या गावी गेला आणि इथे त्याने एक दुकान सुरु केलं.

Web Title: aamir-khan-pk-beggar-role-manoj-roy-life-changed-after-this-film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.