​नागराज मंजुळेच्या सिनेमात आमिर खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 11:04 IST2016-10-26T10:52:46+5:302016-10-26T11:04:48+5:30

बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात शॉकिंग बातमी म्हणावी अशी ही गोष्ट आहे. मराठी सिनेइतिहासात सुवर्ण अक्षरांना ज्याचे नाव कोरले ...

Aamir Khan in Nagraj Manjole's movie? | ​नागराज मंजुळेच्या सिनेमात आमिर खान?

​नागराज मंजुळेच्या सिनेमात आमिर खान?

लीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात शॉकिंग बातमी म्हणावी अशी ही गोष्ट आहे. मराठी सिनेइतिहासात सुवर्ण अक्षरांना ज्याचे नाव कोरले जाईल त्या ‘सैराट’ चित्रपटानंतर नागराज मंजुळे आता थेट मि. परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.

‘सैराट’ पाहून आमिर किती भारावला होता हे तर सर्वांना माहितच आहे. तसे त्याने ट्विट करून कळविले होते. नागराजचे काम तर त्याला आवडते एवढे निश्चित. म्हणून तो त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुकत असल्याची माहिती आहे.

दोघांमध्ये समान दुवा कोण असतील तर ते संगीतकार अजय-अतुल आहेत. या संगीतकार जोडीने आमिरसोबत ‘पीके’ चित्रपटातील एका गाण्यासाठी काम केले होते. त्यामुळे नागराज, आमिर आणि अजय-अतुल असे अद्भूत त्रिकूट एकत्र मिळून काम करत असतील तर बातच काही और आहे!
                                             
आता आमिर नागराजच्या पुढील सिनेमात अभिनय करणार की तो चित्रपट प्रोड्युस करणार याबाबत काही अधिकृत माहिती उपलब्ध नसून या सर्व बंद दरवाजा मागील गोष्टी आहेत. ‘सैराट’च्या अफाट यशामुळे नागराजचे नाव संपूर्ण देशात ज्ञात असून एक असामान्य दिग्दर्शक म्हणून तो ओळखला जातो.

Ammir Nagraj
पुन्हा सैराट? : आमिर खान आणि नागराज मंजुळे

अवघ्या महाराष्ट्राला या सिनेमाने आणि त्याच्या गाण्यांनी अक्षरक्ष: ‘याड लावले’. ग्रामीण भागातून निवडलेल्या कलाकारांच्या अभिनयामुळे लोकांनी हा सिनेमा शंभर कोटींच्या आसपास नेऊन ठेवला. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे तर रातोरात स्टार झाले.

Akash-Thosar-Rinku-Rajguru-h
परश्या अन् आर्ची : आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू

आमिरने यापूर्वी ‘पीपली लाईव्ह’ सिनेमा प्रोड्युस करून त्याची कलात्मक चित्रपटांबद्दलची आपुलकी दाखवून दिलेली आहे. तशाच प्रकारे अस्सल ‘रिजनल सिनेमा’ची निर्मिती करण्यासाठी तो नागराजसोबताी काम करू शकतो यावर विश्वास ठेवणे अवघड नाही.

आणि तसे झाले तर काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

Web Title: Aamir Khan in Nagraj Manjole's movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.