आमिर खानने 'या' कारणामुळे नाकारल्या हॉलिवूडच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 18:39 IST2016-12-16T17:45:23+5:302016-12-16T18:39:46+5:30

बॉलिवूडमध्ये सतत काही तरी एक्सपेरिमेंट करणार तसेच आपल्या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेणार म्हणून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची ओळख आहे.  ...

Aamir Khan has denied Hollywood offers | आमिर खानने 'या' कारणामुळे नाकारल्या हॉलिवूडच्या ऑफर्स

आमिर खानने 'या' कारणामुळे नाकारल्या हॉलिवूडच्या ऑफर्स

लिवूडमध्ये सतत काही तरी एक्सपेरिमेंट करणार तसेच आपल्या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेणार म्हणून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची ओळख आहे. 

आमिर खानला हॉलिवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या मात्र  अजून त्याला कोण त्याला हवी भूमिका न मिळालेल्यामुळे त्यांना हा ऑफर्स नाकारल्या. आमिरच्या म्हणण्यानुसार माझ्यासाठी चित्रपटाची कथा रोमाचंक होणे गरजेची आहे. चित्रपटाची ऑफर  जगाच्या कुठल्या कोपऱ्यातून येतेय यापेक्षा हे माझ्यासाठी महत्त्वाच नाही तर चित्रपटची स्क्रीप्ट मला आवडली पाहिजे. असे आमिर म्हणालाय, कोणत्याही चित्रपटातची स्टोरी  जोपर्यंत माझ्यात उत्साह निर्माण करत तोपर्यंत ती स्टोरी माझ्यादृष्टी देखत अजिबात महत्त्वाची नसते असेही आमिर पुढे सांगितले आहे.  नुकतेच प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण यांनी हॉलिवूडच्या चित्रपटात काम केले आहे.    

येत्या 23 डिसेंबर आमिरचा दंगल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दंगल चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना लोक पसंतीस उतरताना दिसतो. दंगलची कथा कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आणि त्यांच्या दोन मुलींच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.  कुस्ती हे पुरुषांची मक्तेदारी असलेले क्षेत्र मानल्या जाते. महावीर सिंह यांनी मात्र पुरूषांची ही मक्तेदारी मोडत काढत आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवले. यावर याचित्रपटाची कथा आधारित आहे. आमिर खान या चित्रपटात महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारणार आहे तर  साक्षी तन्वर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये झळणार असून फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी आमिरच्या मुलींची म्हणजेच गीता आणि बबिताची भूमिका साकारली आहे.अनेक दिवसांपासून या चित्रपटाची बी टाऊनमध्ये चर्चा आहे. दंगल हा चित्रपट या वर्षातले सगळे चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करेल असा विश्वास अनेकांना आहे.    

Web Title: Aamir Khan has denied Hollywood offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.