आयराच्या लग्नात आमिर खान भावुक; बापलेकीच्या नात्याचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 10:45 IST2024-01-11T10:44:55+5:302024-01-11T10:45:25+5:30

लेकीचं लग्नात बापाचे डोळे पाणावले! आयराच्या लग्नात आमिर खान झाला भावुक, पाहा व्हिडिओ

aamir khan gets emotional at daughter ira khan wedding video surfing on internet | आयराच्या लग्नात आमिर खान भावुक; बापलेकीच्या नात्याचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ

आयराच्या लग्नात आमिर खान भावुक; बापलेकीच्या नात्याचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ

कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केल्यानंतर आता आमिर खानची लेक आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केलं आहे. बुधवारी उदयपूरमध्ये आयरा खान आणि नुपूर शिखरचं कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ख्रिश्चन वेडिंग पार पडलं. लग्नाच्या आधी त्यांचे संगीत आणि मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता आयरा आणि नुपूरच्या ख्रिश्चन वेडिंगमधील आमिर खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

बापलेकीचं नातं हे वेगळचं असतं. त्यामुळेच लाडक्या लेकीला निरोप देताना वडिलांना अश्रू अनावर होतात.मग तो सामान्य माणूस असो किंवा अभिनेता. आमिर खानही लेक आयराच्या लग्नात भावुक झालेला पाहायला मिळाला. स्टेजवर आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या विधी सुरू असलताना आमिरला अश्रु अनावर झाले. आयरा-नुपूरने एकमेकांना अंगठी घालताच आमिरचे डोळे पाणावले. आयराच्या लग्नातील बापलेकीचा हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणणारा आहे. या व्हिडिओत आमिर खान त्याचे डोळे पुसताना दिसत आहे. वरिंदर चावला या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

आयराच्या लग्नातील आमिरचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर आता उदयपूरमध्ये त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे. आयरा-नुपूरचं मुंबईत ग्रँड रिसेप्शनही होणार असल्याची माहिती आहे.  

Web Title: aamir khan gets emotional at daughter ira khan wedding video surfing on internet