सवत माझी लाडकी! लेकीच्या लग्नासाठी आमिर खानच्या दोन्ही Ex पत्नी एकत्र, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 15:25 IST2024-01-02T15:24:53+5:302024-01-02T15:25:17+5:30

आयराच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून लेकीच्या लग्नासाठी आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी एकत्र आल्या आहेत. 

aamir khan ex wife reena dutta and kiran rao come together for daughter ira khan wedding | सवत माझी लाडकी! लेकीच्या लग्नासाठी आमिर खानच्या दोन्ही Ex पत्नी एकत्र, व्हिडिओ व्हायरल

सवत माझी लाडकी! लेकीच्या लग्नासाठी आमिर खानच्या दोन्ही Ex पत्नी एकत्र, व्हिडिओ व्हायरल

सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरीही लेकीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. आमिरची लेक आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आयराच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून लेकीच्या लग्नासाठी आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी एकत्र आल्या आहेत. 

आमिरच्या घरी आयराच्या लग्नाची लगबग सुरू आहे. लग्नासाठी अभिनेत्याच्या बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या माळांनी घर सजविण्यात आलं आहे. लाडक्या लेकीच्या लग्नासाठी आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव एकत्र आल्या आहेत. आयराच्या वेडिंग कार्यक्रमातील काही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये किरण राव आणि रीना दिसत आहेत. आयराच्या लग्नासाठी आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी एकत्र आल्याचं पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. 

आमिरने १९८६ साली रीना दत्ताशी लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. १६ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिरने रीनाशी घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्नगाठ बांधली. काही कारणांमुळे २०२१ साली किरण आणि आमिर घटस्फोट घेत कायदेशीरित्या वेगळे झाले. 

दरम्यान, आमिरची लेक आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधत आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूर कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्ली आणि जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. 

Web Title: aamir khan ex wife reena dutta and kiran rao come together for daughter ira khan wedding