लग्नाला ४ महिने होताच आयराची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, 'मला खूप भीती वाटते...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 09:34 AM2024-04-21T09:34:58+5:302024-04-21T09:35:24+5:30

ira khan: आयराच्या पोस्टमुळे या जोडीच्या नात्यात काही मतभेद निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

aamir-khan-daughter-ira-khan-shared-cryptic-post-after-4-month-marriage-write-i-am-scared | लग्नाला ४ महिने होताच आयराची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, 'मला खूप भीती वाटते...'

लग्नाला ४ महिने होताच आयराची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, 'मला खूप भीती वाटते...'

या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात अभिनेता आमिर खानची (amir khan) लेक आयरा खान (ira khan) लग्नाच्या बेडीत अडकली. फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत आयराने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर आणि कलाविश्वात या लग्नसोहळ्याची बरीच चर्चा झाली. या लग्नसमारंभातील प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अलिकडेच या जोडीच्या लग्नाला ४ महिने पूर्ण झाले आहेत. यामध्येच आयराने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे या जोडीच्या नात्यात काही मतभेद निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आयरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्याविषयीचे बरेचसे अपडेट चाहत्यांना देत असते. यामध्येच आयराने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लग्नानंतर एकाकीपणा जाणवत असल्याचं म्हटलं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला वैवाहिक आयुष्यात काही अडचणी आहेत का? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

नेमकी काय आहे आयराची पोस्ट?

आयराने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मनातील भीती व्यक्त केली आहे. "मी खूप घाबरले आहे. मला एकटीला रहायची खूप भीती वाटते. लाचार होईन याची भीती वाटते. जगातील सगळ्या वाईट गोष्टींची (हिंसा, आजारपण, निर्दयीपणा) मला भीती वाटते. मला कुठे तरी हरवून जाईन याची भीती वाटते. त्रास होईल याची भीती आहे. एकदम शांत होऊन जाईन याचीही भीती वाटते. मला तुम्ही हसत, आनंद काम करतांना पाहता. पण, ज्यावेळी मला भीती वाटते त्यावेळी ती भीती माझ्याभोवती विळखा घालते", असं आयरा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्या आवतीभोवती असे अनेक लोक आहेत जे माझ्यावर खूप प्रेम करतात आणि जर मी कुठे हरवले तर ते मला नक्कीच शोधतील. जर मला कुठे लागलं तर ते माझी काळजी घेतील. मी एक सक्षम व्यक्ती आहे."

काय म्हणाले नेटकरी?

आयराची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक तर्कवितर्क लावले आहेत. इतकंच नाही तर 'तुझ्या वैवाहिक जीवनात सगळं नीट सुरु आहे ना?' असाही प्रश्न अनेकांनी तिला विचारला आहे. 'असा स्ट्रगल सोशल मीडियावर शेअर करायची हिंमत लागते', 'तू एकटी कशी काय? आताच तर तुझं लग्न झालंय ना मग एकटी कशी काय?', 'काय झालं तुला? सगळं ठीक आहे ना?', असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत.

दरम्यान, जानेवारील २०२४ मध्ये नुपूर शिखरे आणि आयराने कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर उदयपूरमध्ये ग्रँड वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Web Title: aamir-khan-daughter-ira-khan-shared-cryptic-post-after-4-month-marriage-write-i-am-scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.