मला ट्रोल करणाऱ्यांनो हे बघा नवे फोटो..., आमिरची लेक इराने ट्रोलर्सला दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 12:28 IST2022-05-15T12:28:08+5:302022-05-15T12:28:58+5:30

Ira Khan hits back to haters : बिकिनीतील इराचं बर्थ डे सेलिब्रेशन पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. यावरून आमिरही ट्रोल झाला होता. आता या ट्रोल करणाऱ्यांना इराने सणसणीत उत्तर दिलं आहे.

Aamir Khan Daughter Ira Khan hits back to haters shares More Bikini Photos | मला ट्रोल करणाऱ्यांनो हे बघा नवे फोटो..., आमिरची लेक इराने ट्रोलर्सला दिलं उत्तर

मला ट्रोल करणाऱ्यांनो हे बघा नवे फोटो..., आमिरची लेक इराने ट्रोलर्सला दिलं उत्तर

Ira Khan hits back to haters : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिट आमिर खान (Aamir Khan) याची लेक इरा खान (Ira Khan) तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. अलीकडे अशाच एका पोस्टमुळे इरा जबरदस्त ट्रोल झाली होती. नुकताच इराचा वाढदिवस झाला. या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केले होते. या फोटोत इरा बिकिनी घालून वडिल, भाऊ व आई यांच्यासोबत केक कापताना दिसली होती.  बिकिनीतील तिचं बर्थ डे सेलिब्रेशन पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. यावरून आमिरही ट्रोल झाला होता. आता या ट्रोल करणाऱ्यांना इराने सणसणीत उत्तर दिलं आहे. माझ्या बर्थ डेचे फोटो पाहून मला ट्रोल करणाऱ्यांनो हे बघा नवे फोटो, असं म्हणत तिने बिकिनीतील आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

इराने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशनच्या फोटोत इराची आई रिना दत्ता, तिचे अब्बा आमिर खान, सावत्र भाऊ आझाद, सावत्र आई किरण राव, इराचा बॉयफ्रेन्ड असे सगळे दिसले होते. या फोटोत इरा बिकिनीत केक कापताना दिसली होती आणि नेमका हाच फोटो युजर्सला खटकला होता. अरे थोडी तरी लाज बाळगा, बिकिनी घालून कोण के कापतं? अशा आशयाच्या कमेंट्स युजर्सनी केल्या होत्या. या ट्रोलर्सला उद्देशून इराने नवे फोटो शेअर केले आहेत. ‘माझ्या बर्थ डेचे फोटो पाहून मला ट्रोल करणं संपलं असेल तर, हे बघा आणखी काही फोटो, असं लिहित तिने हे फोटो शेअर केले आहेत.

या नव्या फोटोंमध्ये इराचा बॉयफ्रेन्ड नुपूर शिखरे, तिचे काही मित्र आणि अभिनेत्री फातिमा सना शेख दिसत आहेत. इरा ही आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता हिची मुलगी आहे. इरा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते आणि यामुळे सतत  चर्चेत असते.

Web Title: Aamir Khan Daughter Ira Khan hits back to haters shares More Bikini Photos