VIDEO : आमिर खानची लाडकी लेक इरा झाली रोमॅन्टिक, बॉयफ्रेन्डसोबत केला डान्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 12:19 IST2019-06-28T12:18:40+5:302019-06-28T12:19:26+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लाडकी लेक इरा सध्या जाम चर्चेत आहे. होय, इराच्या लव्ह रिलेशनशिपची चर्चा सध्या सर्वत्र रंगलीय.

aamir khan daughter ira khan dance video with boyfriend mishaal kirpalani | VIDEO : आमिर खानची लाडकी लेक इरा झाली रोमॅन्टिक, बॉयफ्रेन्डसोबत केला डान्स!!

VIDEO : आमिर खानची लाडकी लेक इरा झाली रोमॅन्टिक, बॉयफ्रेन्डसोबत केला डान्स!!

ठळक मुद्देइराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लाडकी लेक इरा सध्या जाम चर्चेत आहे. होय, इराच्या लव्ह रिलेशनशिपची चर्चा सध्या सर्वत्र रंगलीय. काही दिवसांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. आता इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओही इराने खुद्द शेअर केला आहे. यात व्हिडीओत दोघेही कपल डान्स करताना दिसत आहेत  त्यांच्यासोबत त्यांचे काही कॉमन फ्रेंडसुद्धा आहेत.‘मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा आहे’, असे हा व्हिडीओ शेअर करताना इराने लिहिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून इरा व मिशाल एकत्र दिसत होते. यानंतर  फॅन्सच्या प्रश्नांची उत्तर देताना इराने मिशालसोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता.


इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता.

सध्या ती दिग्दर्शक राम माधवानी यांच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करतेय.  इरा याठिकाणी फिल्म मेकिंगचे बारकावे शिकत आहे. विशेष म्हणजे तिला मेकिंगच्या कोर टीममध्येही संधी देण्यात आली आहे.

इरा आमिर खानसारख्या सुपरस्टार्सची मुलगी आहे. परंतु अशातही ती लो-प्रोफाइल राहून काम करणे पसंत करते. तिला तिच्या टीमबरोबर अतिशय सहजपणे रहायला आणि त्यांच्यात मिसळायला आवडते. स्वत:ला ‘स्टार डॉटर’ म्हणवून घेणे पसंत नाही. ती टीममधील अन्य सदस्यांप्रमाणेच मेहनत करण्यावर भर देते.  

Web Title: aamir khan daughter ira khan dance video with boyfriend mishaal kirpalani