मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:23 PM2024-01-09T15:23:53+5:302024-01-09T15:50:11+5:30

आयरा आणि नुपूर पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत.

aamir khan daughter Ira Khan And Nupur Shikhare At Udaipur Mehendi Ceremony | मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी

मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखर यांनी मुंबईत ३ जानेवरीला रजिस्टर मॅरेज केले. कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता पारंपरिक पद्धतीने आयरा आणि नुपूर विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचे वेडिंग फंक्शन्स उदयपूरमध्ये सुरू झाले आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आयराच्या हातावर आता नुपूरच्या नावाची मेहंदी रंगली आहे. आयरा पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तर आयराच्या मागे नुपूर शिखरे उभा असलेला दिसत आहे.  दोघांच्या हातावर 'आय अर्था आयरा आणि एन अर्थात नुपूर' (I & N) असं मेहंदीने लिहिलेलं दिसत आहे.

रिपोर्टनुसार,  १० जानेवारीला आयरा आणि नुपूर पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत.  तर उदयपूरमध्ये जिथे हा सोहळा पार पडणार आहे. ती राजस्थानमधील ही अत्यंत महागडी प्रॉपर्टी आहे. लग्नानंतर आयरा-नुपूर १३ जानेवारीला मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.  या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

नुपूर आणि आयराच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. . तो वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.दोघांची भेट जिममध्ये झाली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मे महिन्यात आयरा आणि नुपूरचा साखरपुडा पार पडला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Web Title: aamir khan daughter Ira Khan And Nupur Shikhare At Udaipur Mehendi Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.