राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:34 PM2022-03-21T19:34:32+5:302022-03-21T19:35:14+5:30

साउथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर(Jr.NTR)चा आगामी चित्रपट 'आरआरआर' (RRR) मधील गाण्यावर आमिर खानने दमदार डान्स केला आहे.

Aamir Khan Dances To RRR's Naatu Naatu With Alia Bhatt, Jr NTR And Ram Charan | राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ

राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) -ज्युनियर एनटीआर(Jr. NTR)च्या आगामी चित्रपट आरआरआर(RRR Movie)वर सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवण्यात आला आहे. चित्रपटाची रिलीज आता अगदी जवळ आली आहे. ज्याच्या तयारीत चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आदल्या दिवशी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सुपरस्टार आमिर खान(Aamir Khan)नेही सहभाग घेतला होता. जिथे 'मिस्टर परफेक्शनिस्ट' सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर सोबत त्यांच्या आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यावर थिरकताना दिसला होता. यादरम्यान त्याला राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या एनर्जीसोबत जुळवून घेताना घाम फुटला होता. 

आमिर खान या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता. यावेळी आमिर खानला ज्यूनियर एनटीआरने (Jr NTR) आरआरआर' (RRR) सिनेमातील नाटू नाटू या गाण्याची हुक स्टेप शिकवली. मात्र या गाण्याची स्टेप पाहून आमिर म्हणाला की, आपल्याला काही हे जमणार नाही. यानंतर लगेच मागून आलिया भट्ट म्हणते की, एवढं काय नाही, खूप साध्या स्टेप्स आहेत. मी देखील केल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा ज्यूनियर एनटीआर आणि रामचरण आमिर खानला स्टेप्स शिकवल्या आणि मग त्यांच्यासोबत डान्स करण्याचा प्रयत्न आमिर खानने केला.

आमिर खानच्या या डान्सची क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण अभिनीत आरआरआर चित्रपट २५ मार्चला रिलीज होणार आहे. यात आलिया भटशिवाय अजय देवगणची देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Aamir Khan Dances To RRR's Naatu Naatu With Alia Bhatt, Jr NTR And Ram Charan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.