लेकीच्या लग्नात 'बचना ए हसीनो'वर आमिरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:34 PM2024-01-11T18:34:37+5:302024-01-11T18:35:02+5:30

'बचना ए हसीनो' गाण्यावर आमिरने जबरदास्त डान्स केला. आयराच्या लग्नातील आमिरचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

aamir khan dance on bachna e haseeno in daughter ira khan wedding video viral | लेकीच्या लग्नात 'बचना ए हसीनो'वर आमिरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

लेकीच्या लग्नात 'बचना ए हसीनो'वर आमिरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. कोर्ट मॅरेजनंतर आयराने नुपूर शिखरेबरोबर ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाआधी नुपूर आणि आयराचं मेहेंदी, संगीत फंक्शनही पार पडलं. या सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. 

आयरा-नुपूरच्या संगीतसोहळ्यात नवरीच्या कुटुंबीयांनी बाजी मारली. आमिर आणि पत्नी किरण रावने आयरा-नुपूरसाठी खास गाणं गायलं. आमिर आणि किरणसोबत त्यांचा लेक आझादनेही आयारासाठी 'फुलों का तारों का' गाणं गात सगळ्यांची मनं जिंकली. यानंतर आमिरचा संगीत सोहळ्यातील डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेकीच्या लग्नात आमिर बॉलिवूड गाण्यांवर थिरकताना दिसला. 'बचना ए हसीनो' गाण्यावर आमिरने जबरदास्त डान्स केला. आयराच्या लग्नातील आमिरचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

आयराने बॉयफ्रेंड नुपूरशी ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर १० जानेवारीला उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता मुंबईत त्यांचं रिसेप्शन असणार आहे. आयराचा नवरा नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा तो फिटनेस ट्रेनर होता. आमिरचाही फिटनेस ट्रेनर म्हणून नुपूरने काही काळ काम केलं होतं. तेव्हाच आयरा आणि त्याच्यातील प्रेमसंबंध फुलले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: aamir khan dance on bachna e haseeno in daughter ira khan wedding video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.