आमिर खानला 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा, विहीनबाईंकडे केली डिमांड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:08 IST2025-11-21T12:07:47+5:302025-11-21T12:08:08+5:30
आमिर खानला विहीनबाईंच्या हातचा एक महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा आहे.

आमिर खानला 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा, विहीनबाईंकडे केली डिमांड!
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आणि सुपरस्टार आमिर खान सध्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास कारणामुळे चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची लाडकी लेक आयरा खान हिने मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर आमिर खान आणि नुपूरची आई आणि आयाराची सासू म्हणजेच प्रीतम शिखरे यांच्यात एक खास बॉन्डिंग तयार झालं आहे. नुकतीच प्रीतम शिखरे यांनी एका मुलाखतीत व्याही आमिर खान यांच्या एका साध्या पण खास मागणीचा खुलासा केला आहे.
आमिर खानला त्याची लेक आयराच्या सासूबाईंच्या हातचा एक महाराष्ट्रीयन पदार्थ खायची इच्छा आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रीतम शिखरे म्हणाल्या, "त्यांना फक्त माझ्या हातचं वरण भात खायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की मला तुमच्या हातचं वरण भात खायला आवडेल. पण काही ना काहीतरी काम येतात त्यामुळे तो योग जुळून येत नाहीये. पण लवकरच तो येईल".
मोदक खाऊन सुनबाई खुश!
प्रीतम शिखरे यांच्या हातच्या जेवणाचं कौतुक फक्त मुलगा नाही तर त्यांची सून आयरा खान देखील करते. प्रीतम शिखरे म्हणाल्या की, "माझ्या जेवणाचा कौतुक माझा मुलगा आणि सुनबाई करत असतात. एकदा मी उकडीचे मोदक केलेले. आयराला माझ्या हातचे मोदक खूप आवडतात. त्यामुळे ती घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आवर्जून सांगत होती की तुम्ही हे खाऊन बघा तुम्हाला आवडेल. खूप अप्रतिम झाले आहेत". प्रीतम शिखरे यांनी सांगितलं की आयरा त्यांना 'प्रीतम आंटी' म्हणून हाक मारते.