आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज; पण या एका अटीवर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 10:18 IST2019-01-29T10:17:44+5:302019-01-29T10:18:40+5:30

आता आणखी एक स्टारकिड बॉलिवूडच्या वाटेवर आहे आणि या स्टारकिडचे नाव आहे, जुनैद खान. आता हा जुनैद खान कोण, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. होय, तोच तो बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा.

aamir khan all set to launch his son junaid khan in bollywood said we are waiting for a script | आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज; पण या एका अटीवर!!

आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज; पण या एका अटीवर!!

ठळक मुद्दे माझे बायोपिक बनले तर निश्चितपणे जुनैद हाच त्याला योग्य न्याय देऊ शकेल, असे आमिर म्हणाला.

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या स्टार किड्सची चलती आहे. गेल्या वर्षभरात अनेक स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आता आणखी एक स्टारकिड बॉलिवूडच्या वाटेवर आहे आणि या स्टारकिडचे नाव आहे, जुनैद खान. आता हा जुनैद खान कोण, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. होय, तोच तो बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा.

काही वर्षांपूर्वी जुनैदच्या बॉलिवूड डेब्यूविषयी बोलताना आमिर कचरायचा. पण आता मात्र जुनैदने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि पापा आमिरने त्यासाठी कंबर कसलीय. अलीकडे एका मुलाखतीत आमिर जुनैदच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलला. तो म्हणाला की, माझा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. मात्र अद्यापही आम्हाला एका उत्तम स्क्रिप्टचा शोध आहे. मी जुनैदचे काम पाहिले आहे आणि त्याच्या कामावर मी जाम खूश आहे. एक चांगली स्क्रिप्ट मिळताच, त्याच्या चित्रपटावर काम सुरु होईल. अर्थात यासाठी सर्वात आधी त्याला स्क्रिन टेस्ट द्यावी लागेल. ही टेस्ट पास केली तरच तो चित्रपटात असेल. अन्यथा नसेल. मी आधीच त्याला हे बजावले आहे.


या मुलाखतीत आमिरला त्याच्या बायोपिकबद्दलही विचारण्यात आले. तुझे बायोपिक बनले तर त्यात तुझी भूमिका कुणी साकारावी, असे तुला वाटते? असा प्रश्न आमिरला केला गेला. यावर आमिरने जुनैदचे नाव घेतले. माझे बायोपिक बनले तर निश्चितपणे जुनैद हाच त्याला योग्य न्याय देऊ शकेल, असे आमिर म्हणाला.
यापूर्वी करण जोहरच्या शोवर बोलताना आमिर मुलाबद्दल बोलला होता. त्याच्यात टॅलेंट नसेल तर मी कधीही त्याला पाठींबा देणार नाही. तो बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या लायक आहे, असे मला वाटेल तेव्हाच मी त्याला मदत करेल, असे आमिर म्हणाला होता. जुनैद हा आमिरच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे.

Web Title: aamir khan all set to launch his son junaid khan in bollywood said we are waiting for a script