आमीर कोणत्या अभिनेत्रीसाठी जिद्द करतो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 15:54 IST2016-05-27T10:24:11+5:302016-05-27T15:54:11+5:30

फना चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे झाली. या दहा वर्षात चित्रपटाने खूप सारे यश मिळविले. आमीर आणि काजोल यांच्या ...

Aamir keen to actress ... | आमीर कोणत्या अभिनेत्रीसाठी जिद्द करतो....

आमीर कोणत्या अभिनेत्रीसाठी जिद्द करतो....

ा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे झाली. या दहा वर्षात चित्रपटाने खूप सारे यश मिळविले. आमीर आणि काजोल यांच्या अभिनयाला पसंतीही मोठ्या प्रमाणावर मिळाली. विशेषत: आमीरच्या शायरीला अनेकांनी दाद दिली. आता दहा वर्षे पूर्ण होताना चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीने या चित्रपटाविषयी काही आठवणी ट्विटरवर सांगितल्या. 
चित्रपटाची कथा ऐकून दोनच मिनिटात आमीर खानने आपण हा चित्रपट करणार असल्याचे सांगितले होते. तीन कोणत्या अभिनेत्री असाव्यात याबाबत आमीरला विचारले असता तो म्हणाला, काजोल, काजोल आणि फक्त काजोल....
या चित्रपटात काजोलने जुनी या अंध मुलीची भूमिका साकारली होती. आमीर खानने रेहान या आतंकवाद्याची भूमिका निभावली होती. या चित्रपटात जुनी ही सहलीला जाते आणि तिला आमीर खान भेटतो. सुंदर दृष्ये, गाणी आणि संगीतामुळे हा चित्रपट खूप गाजला....

Web Title: Aamir keen to actress ...