'आज की पार्टी तेरी...', शाहरूख खानच्या SRK+अ‍ॅपच्या घोषणेनंतर सलमान खानने दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:31 PM2022-03-15T16:31:46+5:302022-03-15T16:32:46+5:30

'पठान' (Pathan) शिवाय शाहरूख खान (Shahrukh Khan) त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठे सरप्राइज घेऊन आला आहे.

'Aaj Ki Party Teri ...', Congratulations from Salman Khan after the announcement of Shah Rukh Khan's SRK + app | 'आज की पार्टी तेरी...', शाहरूख खानच्या SRK+अ‍ॅपच्या घोषणेनंतर सलमान खानने दिल्या शुभेच्छा

'आज की पार्टी तेरी...', शाहरूख खानच्या SRK+अ‍ॅपच्या घोषणेनंतर सलमान खानने दिल्या शुभेच्छा

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख (Shahrukh Khan)ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता शाहरूख खान पठान (Pathan Movie) चित्रपटातून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. पठान शिवाय शाहरूख खान त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठे सरप्राइज घेऊन आला आहे. हे सरप्राइज म्हणजे त्याचे नवीन अ‍ॅप SRK+. सलमान खानने देखील नुकतेच शाहरूखला त्याच्या नवीन अ‍ॅपसाठी हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

हो. हे खरंय. शाहरूख खानने आपल्या लेटेस्ट ट्विटमध्ये आपल्या सरप्राइजची हिंट दिली आहे.  'SRK+ कमिंग सून' पोस्टरसोबत शाहरूख खानने लिहिले की, काहीतरी होणार आहे. ओटीटीच्या जगात. यापूर्वी शाहरूखने आपल्या सरप्राइजबद्दल सांगितल्यानंतर सलमान खानने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


सलमान खानने शाहरूख खानला शुभेच्छा देत लिहिले की, आज की पार्टी  तेरी तरफ से @iamsrk. नवीन ओटीटी अॅप  SRK+साठी अभिनंदन. सलमानच्या या मेसेजनंतर शाहरूखच्या घोषणेबाबत तर्कवितर्क लावणाऱ्या युजर्सचा अंदाज खरा ठरला.
शाहरूख खान आता डबल जोश आणि पॅशनसोबत कमबॅक करणार आहे. एकीकडे दमदार अॅक्शन चित्रपट पठान तर दुसरीकडे शाहरूखचे सरप्राइज. शाहरूखचे चाहते त्याच्या सिनेमाचे आणि अॅपची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: 'Aaj Ki Party Teri ...', Congratulations from Salman Khan after the announcement of Shah Rukh Khan's SRK + app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.