'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'या' अभिनेत्रीला होती पहिली पसंती! लोकप्रिय गायकाने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:23 IST2025-09-30T14:16:46+5:302025-09-30T14:23:27+5:30
'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती! आदित्य नारायणचा खुलासा, म्हणाला...

'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'या' अभिनेत्रीला होती पहिली पसंती! लोकप्रिय गायकाने केला खुलासा
Gangubai kathiawadi Movie: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयांच सिनेरसिकांसह समीक्षकांनी कौतुक केलं होतं. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला 'गंगूबाई काठियावाडी' हा त्या वर्षातील सुपरहिट सिनेमा ठरला होता. या चित्रपटासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. मात्र, तुम्हाला माहितीये का या चित्रपटासाठी आलिया भट नाही तर दुसऱ्याच अभिनेत्रीला पहिल्यांदा विचारणा करण्याच आली होती. लोकप्रिय गायक आदित्य नारायणने याबाबत खुलासा केला आहे.
अलिकडेच गायक आदित्य नारायणने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.या मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं की,"शापित हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं. त्यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळींसोबत काम करायला सुरुवात केली होती. याचदरम्यान, आदित्यने असंही सांगितलं की भन्साळी सुरुवातीला 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत बनवण्याचा विचार करत होते. पण, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही.
या मुलाखतीत आदित्य म्हणाला, "माझ्याकडे कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे आपण काहीतरी नवीन शिकावं अशी माझी इच्छा होती. लहानपणापासूनच संगीत आणि म्युझिक व्हिडिओ बनवण्यात रस होता, त्यामुळे मी चित्रपट निर्मितीकडे आकर्षित झालो. सोनू निगम यांनी मला विचारलं होतं की मी भन्साळींना असिस्ट का करत नाही? मला ही कल्पना आवडली आणि मी भन्साळींकडे गेलो."
त्यानंतर आदित्य म्हणाला," जेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ते माझ्याकडे बघून हसले.त्यांना वाटलं की पाच दिवसात निघून जाईन. मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी मला ऑफिसला भेटण्यासाठी बोलावलं. पहिल्याच आठवड्यात संजय त्यांनी मला कोणतंही काम दिलं नाही. त्यानंतर मग भन्साळींनी मला काम द्यायला सुरुवात केली."
गंगूबाई काठियावाडी साठी 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती...
याबद्दल बोलताना त्याने सांगितलं," त्यावेळी त्यांच्याकडे 'राम-लीला' आणि 'गंगूबाई काठियावाडी' या दोन चित्रपटांच्या स्क्रिप्ट होत्या त्यावेळी ते 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये राणी मुखर्जीला घेऊन बनवण्याचा विचार करत होते. संजय लीला भन्साळींनी त्यांच्या टीममधील सर्वांना दोन्ही स्क्रिप्ट दिल्या होत्या आणि कोणती स्क्रिप्ट चांगली आहे, असं विचारलं होतं. असा किस्सा आदित्यने शेअर केला.
दरम्यान, 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. अगदी कमी वयातच नवऱ्याने त्यांना कामाठीपुरातील कोठ्यावर विकल्यानंतर त्या माफिया क्वीन कशा झाल्या. ही कथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली.