तारा सुतारियासोबत ब्रेकअप होताच आदर जैनच्या आयुष्यात आली नवी लेडी लव्ह, एक्स गर्लफ्रेंडशीही आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:15 AM2023-11-14T10:15:28+5:302023-11-14T10:21:55+5:30

. आदर जैनच्या नव्या लेडीलव्हबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Aadar jain finds new love after breakup with tara sutaria who is alekha advani | तारा सुतारियासोबत ब्रेकअप होताच आदर जैनच्या आयुष्यात आली नवी लेडी लव्ह, एक्स गर्लफ्रेंडशीही आहे खास कनेक्शन

तारा सुतारियासोबत ब्रेकअप होताच आदर जैनच्या आयुष्यात आली नवी लेडी लव्ह, एक्स गर्लफ्रेंडशीही आहे खास कनेक्शन

आदर जैनने 2017 मध्ये 'कैदी बँड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आदर त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिला. तारा सुतारियासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे आदर पुन्हा एकदा चर्चा विषय ठरला. तारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आदर आयुष्यात अलेखा अडवाणीच्या रुपात नवं प्रेम आलं आहे.  इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याचा रोमँटिक फोटो शेअर करत आदरने अलेखसोबतच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आदर जैनच्या नव्या लेडीलव्हबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

अलेखा वे वेलची  क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, तसेच ती सामाजिक कार्यांसाठी देखील ओळखली जाते. अलेखाने कपडे आणि दागिन्यांच्या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केले आहे, हे तिच्या सोशल मीडिया प्रोफेशलवरुन स्पष्ट होतंय.

तिच्या कंपनीच्या वेबसाइटवर म्हटल्याप्रमाणे, अलेखा अडवाणीने कॉर्नेल हॉटेल स्कूल, न्यूयॉर्कमधून शिक्षण घेतलं आहे. तिने लॉस एंजेलिसमधील डेलॉइटमध्ये काम केले आणि नंतर मुंबईतही काम केलं. अलेखा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि 6,000 हून अधिक फॉलोअर्ससह आहेत. 

अलेखा आदर जैनची एक्स गर्लफ्रेंड तारा सुतारियाची जवळची मैत्रिण आहे. अलेखा याआधीही आदर आणि तारासोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसायची.  करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आदर आणि अलेखासोबत स्पॉट झाला. अलेखाला या पार्टीत रणबीर कपूर, आलिया भट, करीना कपूर, करिश्मा कपूर यांच्यासह इतरांसोबत पोझ देताना दिसली.  आदर जैन हा राज कपूर यांचा नातू आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. 

Web Title: Aadar jain finds new love after breakup with tara sutaria who is alekha advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.